अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा

महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये सोहळा संपन्न

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. अमित आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडे यांचा साखरपुडा सोहळा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला. अमित आणि मिताली यांची ओळख जुनी आहे. याच ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले आणि आज त्यांचा साखरपुडा संपन्न झाला. लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.

आज राज ठाकरेंच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळे याच मुहूर्तावर दोघांचा साखरपुडा समारंभ आयोजित करण्यात आला. मिताली बोरुडेने फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. ती प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे यांची कन्या आहे. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.

शिवसेनेच्या युवा आघाडीची जबाबदारी आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर आहे. मात्र अमित ठाकरे राजकारणात फारसे सक्रीय नाहीत. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत अमित यांनी मनसेचा प्रचार केला होता. अमित यांनी रुपारेल महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Amit thackeray and mitali borude got engaged

ताज्या बातम्या