मुंबई : विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात बसविण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण समारंभास प्रख्यात सिनेअभिनेते अमिताभ बच्चन, पार्श्वगायिका आशा भोसले यांना खास पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या कार्यक्रमात व्यासपीठावर स्थान देण्यात येणार असून ठाकरे हे निमंत्रण स्वीकारणार का, याची उत्सुकता आहे.  

मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच एकनाथ शिंदे यांनी विधान भवनात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र विधान भवनात बसवण्याबाबत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार बनिर्णय घेतल्याचे नार्वेकर यांनी विधिमंडळाच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात जाहीर केले होते. त्यानुसार २३ जानेवारीला ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी शुक्रवारी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यात मध्यवर्ती सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शेजारीच बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय झाल्याचे समजते. शिंदे-फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष पाहता उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
bjp mp ramdas tadas
“मला लोखंडी रॉडने मारलं, माझ्यावर…”, भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?