मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आरोपी अनिक्षा जयसिंघानी हिला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, अमृता फडणवीस यांच्याकडे १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच हा संपूर्ण कट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात अडकवण्यासाठी आखण्यात आल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला.

 चौकशीसाठी अनिक्षाला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणीही पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने मात्र अनिक्षाला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी फौजदारी कट रचण्याच्या आरोपासह भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यातील कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मलबार हिल पोलीस ठाण्यात अमृता फडणवीस यांनी २० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, अनिक्षा आणि त्यांची नोव्हेंबर २०२१ मध्ये पहिल्यांदा भेट झाली. 

AAP MP sanjay Singh (1)
Delhi Liquor Scam: ‘ईडी’ने हरकत न घेतल्याने ‘आप’ नेते संजय सिंह यांना जामीन मंजूर
Sunita Kejriwal
‘केजरीवालांना आशीर्वाद द्या’; पत्नी सुनीता यांची व्हॉट्स अ‍ॅप मोहीम
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांना दिलासा, मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली
Sunita Kejriwal
अरविंद केजरीवालांना अटक होताच पत्नी ॲक्शन मोडमध्ये, सुनीता केजरीवाल होणार दिल्लीच्या पुढच्या मुख्यमंत्री?

वडील पोलिसांना सट्टेबाजांबाबत माहिती देत असून त्यातून पैसे कमवू शकतो. तसेच कारवाई न करण्यासाठी सट्टेबाजांकडूनही पैसे घेऊ शकतो, असे अनिक्षाने आपल्याला सांगितले. त्यानंतर अनिक्षाला गाडीतून खाली उतरवले, असे अमृता फडणवीस यांनी तक्रारीत म्हटले आहे.  १६ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० च्या सुमारास अनिक्षाने आपल्याला दूरध्वनी केला. तेव्हा तिने तिच्या वडिलांवर एका प्रकरणात आरोप करण्यात आले आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक कोटी रुपये देण्याची तयारी आहे, असे सांगितले. हे ऐकताच  तिचा दूरध्वनी बंद केला, असे  तक्रारीत म्हटले आहे.