“जावई आणि काळा पैसा वाचवण्याचेच मलिकांचे ध्येय”; अमृता फडणवीसांची कवितेच्या माध्यमातून टीका

पुरुष असाल तर माझ्यामार्फत देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करू नका,’ असेही अमृता फडणवीसांनी म्हटले होते.

Amrita Fadnavis criticizes Nawab Malik through poetry

भाजपाच्या अनेक नेत्यांचा ड्रग्ज क्षेत्रातील लोकांशी संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड असल्याचा धक्कादायक आरोपही नवाब मलिक यांनी केला होता. तसेच मलिक यांनी ट्विटवरुन अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या जयदीप राणाचा फोटो पोस्ट केला होता. जयदीप राणा ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांनी अमृता फडणवीसांवर अप्रत्यक्षपणे केलेल्या आरोपांनतर त्या चांगल्याच भडकल्या आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटद्वारे पुन्हा एकदा राज्यातील मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. नवाब मलिकांना काळा पैसा वाचवायचा आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

“बिघडलेल्या नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेवर पत्रकार परिषद घेतली. पण प्रत्येक वेळी ते फक्त खोटे बोलले. त्यांचे ध्येय एकच आहे, त्यांना त्यांचा जावई आणि काळा पैसा वाचवायचा आहे!,” असे अमृता फडणवीसांनी म्हटले आहे.

याआधी नवाबा मलिकांवर हल्लाबोल करताना अमृता फडणवीसांनी ‘पुरुष असाल तर माझ्यामार्फत देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करू नका,’ असे म्हटले होते.

नवाब मलिकांनी जयदीप राणासोबत फोटो ट्विट केल्यानंतर अमृता फडणवीसांनी टीका केली होती.“मी परत एकदा सागंते माझ्यावर तुम्ही जे आरोप करत आहात आणि माझ्या माध्यामातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर, आम्ही स्वतंत्र व्यक्ती आहोत, आमची वेगळी ओळख आहे. मी सामाजिक कार्यकर्ती, बँकर आणि गायिका आहे. मी माझी ही ओळख जपली आहे. जर माझ्या अंगावर कुणी आलं तर मी त्याला सोडणार नाही. कारण, मी खऱ्याची साथ सोडत नाही आणि खोट्याची साथ देणाऱ्याला देखील नाही सोडत. हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातय, आमच्याकडे असं काहीच नाही जे ते उघड करू शकतात. आमच्याकडे भूखंड, साखर कारखाने असं काहीच नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही,” असे अमृता फडणवीसांनी म्हटले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amrita fadnavis criticizes nawab malik through poetry abn

ताज्या बातम्या