राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. शुक्रवारी मुंबईतील तीन टक्के घटस्फोट हे इथल्या ट्रॅफिकच्या समस्येमुळे होत असल्याचं विधान त्यांनी केलं. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांना ट्रोल केलं जातंय. अशातच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांच्या या विधानावरून खोचक टोला लगावत “मला वाटतं कॉमेडी आपण टीव्हीसाठी ठेवू. राजकीय मंडळी म्हणून आपण जे समाजकारण करत असतो, तेच आपण करत राहू”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. यावर अमृता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीसांच्या ‘ट्रॅफिकमुळे घटस्फोट’ विधानावर आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले, “आपण कॉमेडी…”!

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

“छोटे राजा साहेब, यापेक्षा मोठी कॉमेडी काय होऊ शकते की No.1-CM च्या शहराला Int Co.TomTom च्या Traffic Index Report मधे-City with World’s Worst Traffic’ चा No.1 क्रमांक दिला गेला आहे. जगात सर्वाधिक-65% Congestion level असल्यामुळे मुंबई दरवर्षी 41,000 Cr+ चे आर्थिक नुकसान सोसत आहे,” असं त्यांनी ट्वीट करून म्हटलंय.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस –

“मी एक सामन्य नागरिक म्हणून बोलत आहे. मी बाहेर निघते तेव्हा मला किती वाहतूक कोंडी होते हे दिसतं, खड्ड्यांनी आम्हाला किती त्रास होतो हे दिसतं. मुंबईत वाहतूक कोडींमुळे घटस्फोट होण्याचं प्रमाण तीन टक्के आहे. कारण आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही”, असं त्या म्हणाल्या होत्या. मात्र नंतर, “सर्वे मंकीच्या सर्वेक्षणातील निरीक्षणांवरूनच मी हे विधान केलं”, असा खुलासा अमृता फडणवीस यांनी केला होता.

आदित्य ठाकरेंचा टोला –

ट्रॅफिकमुळे घटस्फोट होत असल्याच्या अमृता फडणवीसांच्या विधानावर आदित्य ठाकरेंनी खोचक निशाणा साधला. या विधानाविषयी विचारणा केली असता “मला वाटतं कॉमेडी आपण टीव्हीसाठी ठेवू. राजकीय मंडळी म्हणून आपण जे समाजकारण करत असतो, तेच आपण करत राहू”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. याआधी शिवसेनेकडून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील अमृता फडणवीस यांच्या या विधानावर टीका करताना “त्यांच्या या विधानावर हसावं की रडावं हेच कळत नाही”, असं म्हटलं होतं.