उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझानयर विरोधात तक्रार दाखल केली आहे. धमकी आणि कट रचल्याचा आरोप करत अमृता फडणवीसांनी अनिक्षा नावाची डिझायनर आणि तिच्या वडीलांविरूद्ध मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच, १ कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचही तक्रारीत अमृता फडणवीस यांनी नमूद केलं आहे.

मलबार हिल पोलीस ठाण्यात अमृता फडणवीसांनी २० फेब्रुवारीला तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडीलांविरोधात कलम १२०, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली आहे.

murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
nagpur court marathi news, nagpur petitioner donate 25 thousand
दे दान सुटे गिऱ्हाण! कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावली अनोखी शिक्षा; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा
hotel owner attempts suicide in front of police station
हॉटेल व्यावसायिकाचा पोलीस ठाण्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न; काय आहे प्रकार?

हेही वाचा : मुंबई : शीतल म्हात्रे यांचा पाठलाग केल्याप्रकरणी दोघांना अटक

प्रकरण काय?

अमृता फडणवीस यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्यानुसार, “अनिक्षा आणि त्यांची नोव्हेंबर २०२१ साली पहिल्यांदा भेट झाली होती. अनिक्षाने सांगितलं की, ती कपडे, दागिन्यांची डिझायनर आहे. तिने डिझाईन केलेले कपडे आणि दागिने सार्वजनिक कार्यक्रमात घालावे, अशी विनंती केली होती. यानंतर सागर बंगला आणि विविध कार्यक्रमात अनिक्षाशी भेट झाली,” असं अमृता फडणवीसांनी सांगितलं.

“२७ जानेवारी २०२३ रोजी पुण्यातल्या एका कार्यक्रमात अनिक्षा तिथे भेटली. कार्यक्रम झाल्यावर अनिक्षाला कारमध्ये बसवलं. तेव्हा बोलताना अनिक्षाने म्हटलं की, तिचे वडील पोलिसांना बुकींबाबत माहिती देत होते. त्यानुसार, पोलिसांना सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन पैसं कमवू शकतो. कारवाई न करण्यासाठीही सट्टेबाजांकडून पैसे घेऊ शकतो. यानंतर अनिक्षाला कारमधून खाली उतरवलं,” असं अमृता फडणवीसांनी तक्रारीत नोंद केलं.

“१६ फेब्रुवारीला रात्री ९.३० च्या दरम्यान अनिक्षाने फोन केला. तेव्हा सांगितलं की, तिच्या वडिलांना एका प्रकरणात आरोप करण्यात आलं आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक कोटी रूपये देण्याची तयारी आहे. हे ऐकताच फोन कट करत तिचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर १८ फेब्रुवारीला रात्री ११.५५ ते १२.१५ च्या दरम्यान २२ व्हिडीओ क्लीप, तीन व्हॉईस नोटस अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅपवर आले,” असं अमृता फडणवीसांनी सांगितलं.

हेही वाचा : “…अन् त्याच भुताटकीवर राहुल गांधींनी लंडनमध्ये सवाल निर्माण केले”, शिवसेनेचा भाजपावर घणाघात

“१९ फेब्रुवारीला कर्मचाऱ्यांच्या मोबाईल क्रमाकांवर ४० मेसेज, व्हिडीओ, व्हॉईस नोट्स आणि स्क्रीन शॉट्स पाठवण्यात आले. हा नंबर अनिक्षाच्या वडिलांचा असल्याची माहिती मिळाली,” असं अमृता फडणवीसांनी तक्रारीत म्हटलं आहे.