लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी शुक्रवारी दुपारी पाऊणच्या सुमारास फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे फवारे उडत होते. मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले. पाणीगळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू असून जलवाहिनी फुटल्यामुळे अंधेरी ते दादर परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे शनिवारपर्यंत या सर्व भागात पाणीपुरवठा बंद राहील किंवा कमी दाबाने होईल.

Anger among commuters over digging of new concrete road in Dombivli MIDC
डोंबिवली एमआयडीसीतील नवीन काँक्रीट रस्त्याचे खोदकाम केल्याने प्रवाशांमध्ये संताप
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
There has increase in number of potholes in Dronagiri node of Uran during monsoon
द्रोणागिरी परिसर खड्ड्यांत; पाऊस थांबल्याने मार्गावरील धुळीच्या उधळणीने प्रवासी आणि नागरिक त्रस्त
Thane police, Thane traffic, Thane police injured,
ठाणे : वाहतुकीचे नियमन करताना पोलिसांचाच जीव धोक्यात, सुमारे महिन्याभरात पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
water supply in Navi Mumbai, Navi Mumbai water,
नवी मुंबईत शुक्रवारी सकाळीही पाणीपुरवठा नाही
Wardha dead bodies reservoir, Wardha,
वर्धा : जलाशयात आढळले तीन मृतदेह, दोघांची ओळख पटली; पूरबळी संख्या सात
Jewellery stolen Lalbagh procession,
मुंबई : लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान दागिने, मोबाइलची चोरी; सात लाखांचे दागिने, कॅमेरा चोरीला
Entry ban for heavy vehicles in Mumbai including Thane and Navi Mumbai
मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी

पवई परिसरात आरे वसाहतीमधील गौतमनगर विभागात शुक्रवारी दुपारी पाऊणच्या सुमारास तानसा मुख्य जलवाहिनी फुटली. १,८०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे फवारे उडत होते. प्रचंड दाबाने पाण्याचे फवारे आजूबाजूच्या परिसरात, वस्त्यांवर आदळत होते. त्यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले. मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्लेचा पूर्व भाग, सांताक्रूझ, वांद्रे, खार परिसर, बेहराम पाडा, वांद्रे रेल्वे टर्मिनस, धारावी, दादर, माहीम येथील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

हेही वाचा >>>मुंबई : लिपिक पदाच्या भरती प्रक्रियेतील अटी वादात, जाचक अटी रद्द करण्याची मागणी

दरम्यान, जल अभियंता खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जलवाहिनीतून होणाऱ्या पाण्याच्या गळतीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. त्यानंतर दुरुस्तीचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. दुरुस्तीचे काम चोवीस तास चालणार असून त्यामुळे शनिवारपर्यंत अंधेरी ते दादर आणि भांडुपमधील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, तर काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या परिसरातील नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे व महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

पाण्याच्या प्रवाहामुळे घरांचे नुकसान

जलवाहिनी फुटल्यामुळे प्रचंड दाबाने पाणी आजूबाजूच्या वसाहतींमधील घरांवर फेकले जात होते. त्यामुळे या परिसरातील किमान दहा ते बारा घरांचे नुकसान झाले. घरांचे छप्पर उडाले, सामान अस्ताव्यस्त झाले, तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरले.