अंगारकी चतुर्थी : सिद्धीविनायकांच्या ऑनलाइन दर्शनाची २४ तास सोय

श्री सिद्धिविनायक टेम्पलअ‍ॅप डाउलोड करून घरातूनच श्रींच्या दर्शनाचा व आरतीचा लाभ घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

Siddhivinayak
दिवसभर कोणते कार्यक्रम असणार याची देण्यात आली आहे माहिती (संग्रहीत छायाचित्र)

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने गणेशभक्तांना २४ तास ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली आहे. कोविड-19 संसर्ग निर्बंध नियमावली नुसार गणेशभक्तांनी मंदिरात प्रवेश न करता घरातूनच श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यावं, अशी विनंती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष, (राज्यमंत्री दर्जा) आदेश बांदेकर यांनी केली आहे.

श्री सिद्धिविनायक टेम्पल अ‍ॅप डाउलोड करून घरातूनच श्रींच्या दर्शनाचा व आरतीचा लाभ घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, उद्या मंगळवार (दि.२७ जुलै) रोजी अंगारकी संकष्ट चतुर्थी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा देखील सांगण्यात आली आहे.

त्यानुसार, सोमवार मध्यरात्री १२.१० ते १२.२० श्रींची काकड आरती, मध्यरात्री १२.२०ते १.२० पर्यंत श्रींची महापूजा व अभिषेक, मंगळवार पहाटे ३.३० ते ४ वाजेपर्यंत श्रींची महाआरती, दुपारी १२.०५ ते १२.२० पर्यंत श्रींनी नैवेद्य, सायंकाळी ७ वाजता श्रींची धुपारती, रात्री ८.३० ते रात्री १० वाजेपर्यंत श्रींची महापूजा, नैवेद्य, महाआरती आणि रात्री १०.३० वाजता शेजारती नंतर मंदिर बंद होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Angarki chaturthi 24 hours facility for online darshan of siddhivinayak msr