शिंदे फडणवीस सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला. महाविकासआघाडीने परमबीर घेतलेला निलंबनाचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं रद्द केलं आणि परमबीर यांचं निलंबन मागे घेतलं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (१७ मे) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर समितीच्या बैठकीआधी माध्यमांशी बोलत होते.

अनिल देशमुख म्हणाले, “मला फसवण्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर करण्यात आला. त्याबदल्यात त्यांना बक्षीस म्हणून आमच्या सरकारने केलेलं परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आलं.”

devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप
vijay shivtare
निनावी पत्राद्वारे शिवतारेंच्या माघारीवर टीका; पवारांच्या विरोधातील ५ लाख ८० हजार मतदारांनी करायचे काय?

व्हिडीओ पाहा :

“याबाबत मी आमच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सविस्तरपणे बोलणार आहे. या बैठकीनंतरच मी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी बोलेन,” असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं.

“अनिल देशमुखांविरोधातील षडयंत्रांचे सूत्रधार कोण हे आता कळले”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व सरचिटणीस प्रवीण कुंटे पाटील यांनी अनिल देशमुख यांना फसवण्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर कोणत्या अदृश्य शक्तीने केला होता, हे आता समोर आले आहे, असा आरोप केला.

हेही वाचा : विश्लेषण : परमबीर यांचे निलंबन मागे घेण्यामागे काय दडलंय? राजकीय संघर्षात अधिकाऱ्यांचाही वापर?

प्रवीण कुंटे म्हणाले, “देशमुख यांच्यावर सिंह यांनी आरोप केले होते. त्यामुळे देशमुख यांना तुरुंगात जावे लागले. मात्र, परमबीर सिंह यांच्या विरोधात भ्रष्टाचार, खंडणीचे १० गुन्हे दाखल आहेत. ते अनेक दिवस फरार होते. राज्य सरकार परमबीर सिंग यांना संरक्षण देत आहे. उद्यगोपती अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिन ठेवणे तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांचा या प्रकरणात मुख्य सहभाग असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना संरक्षण देण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकार करीत आहे.”

“आवाज दडपण्यासाठी ‘ईडी’ची कारवाई”

“भाजपा व त्यांच्या सरकारच्या विरोधात जो बोलतो, त्याचा आवाज दडपण्यासाठी केंद्र सरकार बोलणाऱ्यांना ईडी, सीबीआय, आयकर विभागाची नोटीस पाठवते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील राज्यभर दौरे करून भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आणत आहेत. त्यामुळे त्यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे,” असा आरोप कुंटे पाटील यांनी केला.