scorecardresearch

वाझेला व्यक्तिगत ओळखत नाही ; अनिल देशमुख यांचा दावा

चांदिवाल आयोगासमोर सोमवारी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या वकिलाने अनिल देशमुख यांची उलटतपासणी केली.

मुंबई: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची नियुक्ती केली आहे. चांदिवाल आयोगासमोर सोमवारी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या वकिलाने अनिल देशमुख यांची उलटतपासणी केली. यातील एका प्रश्नाला उत्तर देताना आपण वाझेला व्यक्तिगत ओळखत नसल्याचे देशमुख सांगितले.

उलटतपासणीच्या वेळी देशमुख यांना तुम्ही सीआयडी तपासाचे आदेश दिले होते का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. सीआयडीच्या अधिकाऱ्यांना मी आदेश दिले होते. यात चौकशी झाल्याचे कळवले. त्यामुळे पुन्हा चौकशी करण्याची गरज नसल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. पण मी त्या तपासासंदर्भात समाधानी नव्हतो. कारण त्या प्रकरणात व्यवस्थित चौकशी झाली नव्हती. मला अनेक व्यक्ती भेटल्या होत्या. त्यांनी या प्रकरणाचा तपास व्यवस्थित झाला नाही आणि सरकारने कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले. म्हणून मी पुन्हा चौकशीचे आदेश इतर अधिकाऱ्यांना दिले. मात्र या प्रकरणाचा आणि त्या प्रकरणाचा काहीही संबध नाही.

तसेच सीआययू विभागात कार्यरत असताना वाझे सहपोलीस आयुक्तांना कामाचा अहवाल देत नव्हता.

तुम्हाला त्याबाबत काही तक्रार आली होती का, असे विचारले असता त्यावर देशमुख यांनी ३० मार्च २०२१ पूर्वी तशी कोणतीही तक्रार आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anil deshmukh claims that he does not know sachin vaze personally zws

ताज्या बातम्या