‘देशमुखांच्या मुलाचा गैरव्यवहारात सहभाग’

हृषिकेशला सहावेळा समन्स बजावूनही तो चौकशीसाठी हजर झालेला नाही

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश याचा आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय सहभाग होता आणि त्याने वडिलांना बेकायदा कमावलेली रक्कम देणगी म्हणून दाखवण्यास मदत केली होती, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी विशेष न्यायालयात केला. तसेच हृषिकेश याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची विनंती केली.

‘ईडी’ने समन्स बजावल्यानंतर आणि वडिलांना अटक करण्यात आल्यावर हृषिकेश याने अटक टाळण्यासाठी विशेष न्यायालयात  अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्याच्या अर्जावरील सुनावणी न्यायालयाने ४ डिसेंबरला ठेवली आहे. यावेळी ‘ईडी’तर्फे हृषिकेषच्या अर्जावर उत्तर दाखल करण्यात आले. त्यात हृषिकेशला जामीन मंजूर करण्यात आल्यास पुरावे नष्ट केले जाण्याची आणि खटला प्रभावित करण्याची शक्यता ईडीने व्यक्त केली आहे. आतापर्यंतच्या तपासात देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नियंत्रणाखाली ११ कंपन्या असल्याचे उघड झाले आहे. त्यातील बहुतांशी कंपन्यांमध्ये हृषिकेश संचालक किंवा समभागधारक आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या माध्यमातून मुंबईतील बार व रेस्टॉरंट मालकांकडून वसूल केलेली ४.७० कोटी रुपयांची रक्कम हृषिकेशने वडिलांसोबत हवालामार्फत वळवली. हृषिकेशला सहावेळा समन्स बजावूनही तो चौकशीसाठी हजर झालेला नाही, असा दावाही ईडीने त्याच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करताना केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anil deshmukh son hrishikesh actively involved in laundering money zws

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या