अनिल देशमुख यांच्या मुलाला ‘ईडी’कडून समन्स

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपये खंडणीच्या आरोपानंतर ‘ईडी’कडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर आता सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला समन्स बजावले आहेत. त्याला शुक्रवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपये खंडणीच्या आरोपानंतर ‘ईडी’कडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर चार कोटी १८ लाख रुपये जमा झाले. ही रक्कम एका व्यक्तीद्वारे संस्थेच्या खात्यात जमा केल्याचा ‘ईडी’चा दावा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anil deshmukh son summoned by ed akp

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या