मुंबई : पशुसंवर्धन आयुक्तालयाने टॅगिंग (कानात बिल्ले मारणे) करूनच पशुगणना करण्याचे आदेश दिले आहेत. बहुतांश प्रगणक कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. शिवाय प्रगणकांची संख्या तोकडी आहे. प्रगणकांना पुरेसे प्रशिक्षणही दिलेले नाही, त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या २१ पशुगणनेचे काम रखडले आहे. सचिव डॉ. एन. रामास्वामी यांनी गंभीर दखल घेऊन फेब्रुवारीअखेर पशुगणना पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

देशभरात २५ ऑक्टोंबरपासून पशुगणना सुरू झाली. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यामुळे २५ नोव्हेंबर पशुगणना सुरू झाली आहे. मुळात पशुसंवर्धन विभागाकडे मनुष्यबळाची वानवा आहे. त्यात जनावरांचे टॅगिंग करण्याचे कामही रखडले आहे. आयुक्तालयाने जनावरांचे टॅगिंग करूनच पशुगणना करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय बहुतांश प्रगणक कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. त्यांना पुरेसे प्रशिक्षणही मिळालेले नाही. त्यामुळे पहिले महिना – दीड महिना अडखळत गणना सुरू होती. आता पशुगणनेने गती घेऊन सुमारे ४२ टक्के गणना पूर्ण झाली आहे.

ugc decides to extend deadline for selection of professors principals vice chancellors pune news
प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू निवड मसुद्यावर किती हरकती-सूचना? २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा यूजीसीचा निर्णय
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Boundaries of seven new police stations determined
पुणे : सात नव्या पोलीस ठाण्याची हद्द निश्चिती
beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
Marathi mandatory in government offices news in marathi
सरकारी कार्यालयात ‘मराठीतच बोला!’ कर्मचारी मराठीत न बोलल्यास शिस्तभंगाची कारवाई
private hospital news in marathi
राज्यभरातील खासगी रुग्णालयांची झडती… आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतर आता…
rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द

हेही वाचा – कापूस उत्पादन ३०४ लाख गाठींवर जाणार, कापड उद्योगाला मोठा दिलासा; जाणून घ्या कॉटन असोशिएशन ऑफ इंडियाचा अंदाज

यंदाची २१ वी पशुगणना पहिल्यादांच मोबाईल ॲपद्वारे होत आहे. राज्यातील ४४ हजार ४७० गावे आणि ७ हजार ९२२ प्रभाग, असे एकूण ५२ हजार ३९२ ठिकाणी गणना सुरु आहे. त्यासाठी ७ हजार ७४९ प्रगणक आणि १ हजार ४२४ पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत जेमतेम ४० टक्के गणना झाली होती. गुरुवारपर्यंत (२३ जानेवारी) गणना ४२ टक्क्यांवर गेली आहे. गुरुवारी पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी यांनी आढावा बैठक घेऊन पशुगणनेला गती देऊन फेब्रुवारीअखेर पशुगणना पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

पशुगणनेसाठी ग्रामीण भागात प्रत्येक तीन हजार कुटुंबाला एक प्रगणक तर शहरी भागासाठी प्रत्येक चार हजार कुटुंबाला एक, अशी प्रगणकांची नेमणूक करण्यात आली आहे. गाव आणि प्रभागांच्या संख्येच्या तुलनेत प्रगणकांची संख्या तोकडी आहे. त्यामुळे प्रगणकांवर कामाचा ताण येऊन गणना करण्यास विलंब होताना दिसत आहे. मोबाईल ॲपद्वारे गणना सुरू असल्यामुळे मोबाईला नेटवर्क असणे गरजेचे आहे. दुर्गम, डोंगराळ भागात मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे प्रगणकांना ऑफलाइन माहिती संकलित करून नेटवर्क असलेल्या ठिकाणी येऊन ॲपमध्ये समाविष्ट करावी लागत आहे.

हेही वाचा – मुंबई : दूरस्थ शिक्षणापासून विद्यार्थी दूर, यंदा १६ अभ्यासक्रमांसाठी अवघे २४ हजार ८९४ विद्यार्थी

फेब्रुवारी अखेरपर्यंत पशुगणना पूर्ण करण्याचे आदेश

राज्यात सुरू असलेली २१ पशुगणना प्रारंभी रखडली होती. आता पशुगणनेतील अडथळे दूर करून फेब्रुवारीअखेर पशुगणना पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी यांनी दिले.

Story img Loader