मुंबई : महायुती सत्तेत असताना तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्यात ३४१ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या आरोपाच्या अनुषंगाने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) दमानिया यांच्याकडे चौकशी केली. या वेळी दमानिया यांनी महत्त्वाची माहिती आणि कागदपत्रे सुपूर्द केली.

कृषी विभागातील घोटाळ्याच्या आरोपासंदर्भात ‘एसीबी’ने बुधवारी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. बुधवारी दुपारी त्या मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरळी येथील मुख्यालयात आल्या. त्या सुमारे ४ तास कार्यालयात होत्या. ‘आज झालेल्या चौकशीत घोटाळ्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती तसेच काही कागदपत्रे सादर केली, ’ अशी माहिती दमानिया यांनी दिली.