मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. हजारे यांना विषाणूजन्य संसर्ग तसेच मूत्रमार्गाचा संसर्ग झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अण्णा हजारे हे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले असून, त्यांच्या आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या आणि उपचार करण्यात येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर संसर्गजन्य विकारतज्ज्ञ डॉ. गौतम भन्साली यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात दाखल
अण्णा हजारे हे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले असून, त्यांच्या आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या आणि उपचार करण्यात येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-08-2026 at 23:20 IST | © The Indian Express (P) Ltd
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazare hospitalised mumbai health update bombay hospital mumbai print news zws