मुंबई :  केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार  राज्यातील महत्त्वाच्या संस्था  राज्याबाहेर हलवून महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये आता १९५८ मध्ये नागपूर येथे स्थापन झालेल्या केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाच्या मुख्यालयाची भर पडल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला.   

 १९५८ मध्ये स्थापन झालेल्या केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाने विविध सामाजिक, आर्थिक समस्यांवर जागरुकता निर्माण करून संघटित आणि असंघटित कामगारांच्या सक्षमीकरणासाठी काम केले आहे.  देशातील ५० विभागीय कार्यालये, ९ उपविभागीय कार्यालय आणि ६ विभागीय कार्यालयांचे काम या मुख्यालया अंतर्गत चालते. मागील चार-पाच वर्षापासून हे कार्यालय दिल्लीला हलवण्याचे प्रयत्न सुरु होते अखेर ते हलवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मोदी सरकारने जाणीवपूर्वक  महाराष्ट्रातील  संस्था महाराष्ट्राबाहेर हलवल्या आहेत, अस आरोप  सावंत यांनी केला.