शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा एक नवा गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून किरीट सोमय्या यांच्यावर हा आरोप केला आहे. ईडी आणि सीबीआयच्या रडारवर असलेल्या कंपन्या किरीट सोमय्या यांच्या संस्थेला देणगी कशी देतात असा सवाल त्यांनी केला आहे. 

संजय राऊत ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले आहेत ? 

किरीट का कमाल!!

२०१३-१४

किरीट यांनी एका कंपनीवर आरोप केले

२०१६

कंपनीच्या प्रमुखाची ईडीमार्फत चौकशी झाली

२०१८-१९ 

युवक प्रतिष्ठानला त्याच कंपनीकडून मोठी देणगी मिळाली

तुम्ही घटनाक्रम बघा!!

ही ईडी किंवा इओडब्ल्यूच्या चौकशीची केस नाही का ?

भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदर संजय राऊत यांच्यातील वादाचा पुढचा अंक सुरू झाला आहे. एका बाजूला किरीट सोमय्या संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल करत आहेत तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर नवा आरोप केला आहे. ज्या कंपनीमधील गैरव्यवहारांबाबत किरीट यांनी तक्रार केली आहे त्याच कंपनीकडून किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मोठी देणगी मिळाली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या आरोपानुसार २०१३-१४ या वर्षी किरीट यांनी एका कंपनीवर आरोप केले. २०१६ ला त्या कंपनीच्या प्रमुखांची एईडीमार्फत चौकशी झाली आणि २०१८-१९ ला किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्टान या संस्थेला त्या कंपनीकडून मोठी देणगी मिळाली. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी या किरीट सोमय्या यांच्या संस्थेला देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कोट्यावधींच्या देणग्या मिळाल्याचा आरोप केला आहे.  

 तर दुसऱ्या बाजूला किरीट सोमय्या संजय राऊत यांच्या विरोधात मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात अब्रूनुकसानीची तक्रार करत आहेत. त्यामुळे किरिट