छापा नाही तर… शाहरुख खानच्या मन्नतवर अधिकारी का गेले होते?; NCB नेच केला खुलासा

एनसीबीचे अधिकारी शाहरुखच्या घरी दाखल झालेले असतानाच वांद्रे येथे अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीचा छापा पडला.

Mannat
दुपारच्या सुमारास शाहरुखच्या घरी पोहचले एनसीबीचे अधिकारी (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी म्हणजेच एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज शाहरुख खानच्या घरी भेट दिली. मात्र त्याचवेळी दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर आज दुपारच्या सुमारास छापा टाकला. एकाच वेळी या दोन्ही घडामोडी घडल्याने शाहरुखच्या घरी एनसीबीने छापा टाकल्याचं वृत्त काही ठिकाणी दाखवण्यात आलं. मात्र आता यासंदर्भात एनसीबीनेच स्पष्टीकरण दिलं आहे.

शाहरुखच्या बंगल्यामधून बाहेर आल्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. आम्ही कागदोपत्रांसंदर्भातील कामासाठी येथे आलो होतो. आम्ही काहाही शोधाशोध केलेली नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळेच शाहरुखच्या घरी एनसीबीने छापा टाकलेला नव्हता. मुलगा आर्यन खानच्या अटकेप्रकरणी काही नोटीस आणि इतर कायदेशीर कागदोपत्री गोष्टींच्या पूर्ततेसाठी अधिकारी मन्नतवर गेले होते असं सांगण्यात आलं आहे.

शाहरुखच्या घरी एनसीबीचं एक पथक या कामासाठी गेलेलं असतानाच दुसरीकडे वांद्रे येथे अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीने छापा टाकला. एनसीबीने अनन्याला चौकशीसाठी दुपारी दोन वाजता मुंबई एनसीबीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितल्याची माहिती या छाप्यानंतर समोर आली. दरम्यान या छाप्याचा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या प्रकरणाशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

एनसीबीने अनन्याला चौकशीसाठी बोलावणं, तिच्या घरावर छापा टाकणं हे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय. अनन्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची मैत्रीण आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला.

आज सकाळीच शाहरुख खानने आर्थर रोड तुरुंगामध्ये जाऊन मुलगा आर्यन खानची भेट घेतली. शाहरुख येणार असल्याची कोणालाही माहिती नव्हती. अचानक सकाळी ९ वाजता शाहरुख खान साध्या कारने आर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी गौरी किंवा मुलगी नव्हती. फक्त खासगी सुरक्षारक्षक त्याच्यासोबत होते. यानंतर नातेवाईकांना आत जाण्याची परवानगी आहे त्या गेटमधून शाहरुख खान आर्यनला भेटण्यासाठी गेला. शाहरुख खानने आर्यनला भेटण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन पोहोचला होता. जवळपास १५ ते २० मिनिटांच्या भेटीनंतर शाहरुख खान तेथून रवाना झाला. यावेळी त्याने प्रसारमाध्यमांसमोर काहीही भाष्य करण्यास नकार दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anti drugs agency at shah rukh khan home for paperwork in son aryan case scsg

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या