नक्षलविरोधी अभियान हेलिकॉप्टरचे २ महिन्यांचे भाडे ३ कोटी

गडचिरोलीच्या दुर्गम भागात, जंगलांमध्ये टेहळणी व मदतकार्य करण्यासाठी हेलिकॉप्टर भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहे.

मुंबई : गडचिरोली भागातील नक्षलवाद्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नक्षलविरोधी अभियान राबवण्यासाठी राज्य पोलीस दलाने भाडेतत्त्वावर घेतलेल्या हेलिकॉप्टरचे २ महिन्यांचे भाडे दोन कोटी ९६ लाख आहे.

गडचिरोली हा भाग नक्षलग्रस्त असल्याने आणि नक्षलवाद्यांनी तेथे वारंवार सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले केल्याने या भागात नक्षलविरोधी अभियान महाराष्ट्र पोलिसांनी हाती घेतले आहे.

त्यासाठी गडचिरोलीच्या दुर्गम भागात, जंगलांमध्ये टेहळणी व मदतकार्य करण्यासाठी हेलिकॉप्टर भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहे. मे. पवनहंस लि. या कं पनीकडून स्थिर मासिक भाडे व हवाई उड्डाणाचे तास या समीकरणांवर आधारित भाडेकरार करून हेलिकॉप्टर घेण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anti naxal operation helicopter for 2 months rent of rs 3 crore akp

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या