आयफोन-१३ बाजारात…

अ‍ॅपल कंपनीने मंगळवारी कार्यक्रमाद्वारे नव्या उत्पादनांची घोषणा केली. त्यात आयफोन १३ हा सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

अ‍ॅपलच्या ग्राहकांची प्रतीक्षा अखेर मंगळवारी संपली. अ‍ॅपलने आयफोन १३ सह अ‍ॅपल वॉच -७, आयपॅड मिनी आदी उत्पादनांची घोषणा केली असून, या अद्ययावत उत्पादनांमध्ये अधिकाधिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

अ‍ॅपल कंपनीने मंगळवारी कार्यक्रमाद्वारे नव्या उत्पादनांची घोषणा केली. त्यात आयफोन १३ हा सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. नव्या १०.२ इंची आयपॅडच्या किमती ३०,९०० रुपयांपासून आहेत. अ‍ॅपल ७ वॉचमध्येही नव्या सुविधा असून, अनेक रंगसंगती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘न्यू आयपॅड मिनी’ ५ जी युुक्त असून, त्याचा डिस्प्ले ८.३ इंची आहे.

नवा आयपॅड २०२१ हा एलटीई आणि वायफाय सुविधायोग्य असून त्याची क्षमता ६४ जीबी इतकी असेल. अ‍ॅपल आयपॅड मिनी हेसुद्धा बाजारात आणले असून ते नव्या गुलाबी रंगात उपलब्ध आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Apple launches iphone 13 market akp

ताज्या बातम्या