राज्यातील एमबीए, एमएमएस यांच्यासह विविध पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘सीईटी’करिता १८ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू करण्यात येणार आहे.
कोणत्याही पदवी परीक्षेत ५० टक्के गुणांची किमान अट या सीईटीकरिता असणार आहे. मागासवर्गीय आणि अपंग विद्यार्थ्यांकरिता ही अट ४५ टक्के गुणांची असेल. एमबीए, एमएमएस, पीजीडीबीएम, पीजीडीएम या व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रवेशपरीक्षेतून केले जातात. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या http://www.dtemaharashtra.gov.in/mba2015 या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येतील. १४ आणि १५ मार्चला ही सीईटी ऑनलाइन होणार आहे. त्याकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.