scorecardresearch

Premium

MHADA Lottery: अखेर प्रतीक्षा संपली! पुण्यातील म्हाडाच्या ५ हजार ८६३ घरांसाठी आजपासून अर्जविक्री-स्वीकृती; ‘या’ तारखेपासून सोडत

MHADA Houses 2023 in Pune म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ५ हजार ८६३ घरांसाठी आज, मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यानुसार आज दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाईन अर्जविक्री- स्वीकृतीस सुरुवात होणार आहे.

MHADA Lottery 2023 in Pune
म्हाडा घरांची सोडत

मुंबई : MHADA Houses Pune म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ५ हजार ८६३ घरांसाठी आज, मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यानुसार आज दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाईन अर्जविक्री- स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया २९ सप्टेंबरपर्यंत सुरु रहाणार आहे तर १८ ऑक्टोबरला सोडत काढली जाणार आहे. मार्चमध्ये पुणे मंडळाने सुमारे ६ हजार घरांची सोडत काढली होती. त्यानंतर आणखी एक सोडत काढण्याचे जाहीर करून त्यानुसार तयारी सुरू केली होती. अनेक दिवसांपासून इच्छुकांना या सोडतीची प्रतीक्षा होती.

अखेर मंडळाने मंगळवारी ५ हजार ८६३ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मंगळवारी १२ वाजल्यापासून अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्यासाठी २९ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. पात्र अर्जांची अंतिम यादी १६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. पुण्यातील म्हाडाच्या कार्यालयात १८ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता सोडत काढली जाणार आहे. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील  ४०३, पीएमएवायमधील ४३१, १५ टक्के सामाजिक गृहयोजनेतील ३४४, म्हाडा गृहनिर्माण प्रथम प्राधान्य योजनेतील २४४५ आणि २० टक्क्यातील २२४० घरांचा यात समावेश आहे.

Onion auction Nashik district
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव पूर्ववत होण्याची चिन्हे, विंचूरपाठोपाठ निफाड उपबाजारात लिलावाला प्रारंभ
Nagzira Tiger Reserve Safari Begins
नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सफारी सुरू, कोका सफारी लांबणीवर; कारण काय? जाणून घ्या…
Mhada Konkan Mandal Lottery
म्हाडा कोकण मंडळ सोडत नोव्हेंबर २०२३ : आतापर्यंत अनामत रक्कमेसह केवळ १०२६ अर्ज
tadoba andhari tiger reserve
ताडोबासह राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पाच्या बुकींगसाठी आता एकच संकेतस्थळ; २३ सप्टेंबर पासून पर्यटकांच्या सेवेत दाखल

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Application sale for 5 thousand 863 houses of mhada in pune from today mumbai print news ysh

First published on: 05-09-2023 at 09:32 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×