एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान एसटीची वाहतूक काही प्रमाणात सुरू ठेवण्याची जबाबदारी पेलणारे कंत्राटी चालक आता बेरोजगार होणार आहेत. महामंडळाने जवळपास ८०० चालकांचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये संप सुरू केला. त्यावेळी सेवा सुरू ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर चालकांची भरती करण्यात आली. एप्रिलमध्ये या चालकांचे कंत्राट वाढवण्यात आले. मात्र, आता नियमित कर्मचारी रुजू झाल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी पुरेसे काम नाही. त्यामुळे आजपासून त्यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश एसटीच्या वाहतूक विभागाने राज्यातील विभाग नियंत्रकांना दिले आहेत.