Appointment twelve MLAs postponed Adjournment 14th October On Legislative Council ysh 95 | Loksatta

बारा आमदारांची नियुक्ती लांबणीवर; १४ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती

विधान परिषदेवरील रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ जागा पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच १४ ऑक्टोबरपर्यंत भरण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे.

बारा आमदारांची नियुक्ती लांबणीवर; १४ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती
संग्रहित छायाचित्र

मुंबई : विधान परिषदेवरील रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ जागा पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच १४ ऑक्टोबरपर्यंत भरण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. आधीच्या महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेली १२ नावांची यादी रद्द करण्याची विनंती शिंदे-फडणवीस सरकारने राज्यपालांना केली होती. त्यानुसार राज्यपालांनी ती यादी रद्द केली होती. त्यानंतर शिंदे सरकारने १२ जणांची नियुक्ती करण्याची प्रकिया सुरू केली होती. मात्र, नोव्हेंबर २०२० मध्ये शिफारस केलेल्या नावांची यादी राज्यपालांनी प्रलंबित ठेवली, याकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. राज्यपालांच्या या कृतीबद्दल याचिकाकर्त्यांने तक्रारीचा सूर लावला. त्यांचा युक्तिवाद ऐकल्यावर यावर सुनावणी होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने सोमवारी नोंदविले. पुढील सुनावणीची तारीख १४ ऑक्टोबर आहे. तोपर्यंत नवीन नावांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यास न्यायालयाने मनाई केली. त्यामुळे या बारा आमदारांची नियुक्ती आणखी रखडणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
रिक्षाची दोन, तर टॅक्सीची तीन रुपयांनी भाडेवाढ; कुल कॅबचा प्रवासही शनिवारपासून महाग 

संबंधित बातम्या

खारमध्ये डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, पीडिता म्हणाली, “त्याने माझे…”
विश्लेषण: डोंगर आणि तलावाखालून जाणारा मुंबई-पुणे द्रुतगती बोगदा कसा आहे? त्याचा फायदा काय होईल?
“एक पठ्ठ्या ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम…”, सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका
‘तो’ कबुतराचं मांस चिकन म्हणून हॉटेल्सला विकायचा; मुंबईमधील धक्कादायक प्रकार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; काय सुरू काय बंद? जाणून घ्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: सोसायट्यांमधील पाणीगळती थांबवा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना
मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये चुकूनही करू नका ‘हे’ पदार्थ गरम; आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक
Padma Bhushan: सुंदर पिचईंना प्रतिष्ठित ‘पद्म भुषण’ प्रदान; म्हणाले, “भारत माझा एक भाग आणि…”
“सुहानाने मला…” शाहरुखने सांगितलं ४ वर्षे कामातून ब्रेक घेण्यामागचं खरं कारण
अलिबाग: सुक्या मासळीचा भाव वाढला; मच्छी विक्रीतून होतेय करोडोंची उलाढाल…