मुंबई : क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढण्यावरून झालेल्या वादातून टोळक्याने जोगेश्वरी पश्चिम परिसरात एका व्यावसायिकाच्या गाडीची तोडफोड केली. तसेच प्रकरण मिटवण्यासाठी व्यावसायिकाकडे ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी सहाजणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, वांद्रे पश्चिम येथील व्यावसायिक आशिष यादव व त्यांचे मित्र क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत बुधवारी दुपारी सांताक्रुझ विमानतळाजवळील सहारा स्टार हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी सना गिल व शोबित ठाकूर यांनी पृथ्वी शॉकडे सेल्फी काढण्याचा आग्रह धरला. त्याने त्यांच्यासोबत सेल्फी काढला, पण ते वारंवार सेल्फी काढण्याची मागणी करू लागले. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाने त्यांना हॉटेलमधून बाहेर काढले. यामुळे संतप्त झालेल्या गिल व ठाकूर यांनी इतर साथीदारांना तेथे बोलावले. तसेच त्यांना आशिष यादव यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांच्या बीएमडब्ल्यू गाडीचा पाठलाग केला आणि लोटस पेट्रोल पंपजवळ बेसबॉल स्टीकने त्यांच्या गाडीची पुढची व मागची काच फोडली. यादव यांच्या चालकाने प्रसंगावधान दाखवून गाडी ओशिवरा पोलीस ठाण्यासमोर आणली. तेथेही आरोपींनी यादव यांच्यासोबत वाद घातला. त्यावेळी त्यांनी प्रकरण मिटवण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
Ramdev Baba
“आम्ही जाहीर माफी मागण्यासाठी तयार”, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रामदेव बाबांची प्रतिक्रिया
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

हेही वाचा – मुंबई : गणेशोत्सवात मध्यरात्री १२ वाजेपर्यंत धनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी, वर्षभरातील ११ दिवसांची यादी जाहीर

हेही वाचा – समृद्धी महामार्गावर ‘खाण्याचे’ वांदे कायम, फूड प्लाझाच्या फेरनिविदेला मुदतवाढ

यादव यांनी याप्रकरणी ओशिवरा पोलिसांकडे तक्रार केली असून, पोलिसांनी रात्री उशिरा याप्रकरणी खंडणीचा व बेकायदेशिररित्या जमाव जमवल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.