सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम मिळणार

 निवृत्तीवेतनधारकांना जुलैच्या निवृत्तीवेतनाबरोबर थकबाकीचा दुसरा हप्ता रोखीने देण्यात येईल.

मुंबई : राज्य शासकीय कर्मचारी, अन्य पात्र कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा गेल्यावर्षी  १ जुलै २०२० रोजी देय असलेला हप्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. १ जुलै २०२१ रोजी देय असलेल्या तिसऱ्या हप्ता्याबाबत सरकारने निर्णय घेतलेला नाही. आर्थिक चणचणीमुळे गेल्यावर्षी दुसरा हप्ता देण्यात आला नव्हता.

सातव्या वेतन आयोगाच्या थकबाबीची रक्कम २०१९-२० पासून पाच वर्षांत  समान  हत्याने देण्याचा निर्णय ३० जानेवारी २०१९ रोजी सरकारने घेतला होता. त्यानुसार एक जुलै २०२० रोजी दुसरा तर २०२१ रोजी तिसरा हप्ता देय आहे. पण करोनामुळे शासनाच्या महसुलात घट झाल्याने सध्या फक्त दुसरा हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निवृत्तीवेतनधारकांना जुलैच्या निवृत्तीवेतनाबरोबर थकबाकीचा दुसरा हप्ता रोखीने देण्यात येईल. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ऑगस्टच्या वेतनाबरोबर तर जिल्हा परिषदा, अनुदानित शाळा व अन्य पात्र संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबरच्या वेतनाबरोबर थकबाकीचा दुसरा हप्ता देण्यात येईल. भविष्यनिर्वाह निधी योजनेतील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत तर अंशदायी निवृत्तीवेतन योजनेतील कर्मचाऱ्यांना हा हप्ता रोखीने दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Arrears of the seventh pay commission will be paid akp

ताज्या बातम्या