क्रिकेटपटूच्या कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्यास अटक

नुकतीच पीएचडी करण्यासाठी त्याने नोकरी सोडली आहे.

मुंबई : एका भारतीय क्रिकेटपटूच्या कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्यास सायबर पोलिसांनी हैदराबाद येथून ताब्यात घेतले. आरोपी माहिती तंत्रज्ञान अभियंता असून सध्या पीएचडी करत आहे.

अकुबथीनी रामनागेश (२३) असे अटक आरोपीचे नावे आहे. नुकतीच पीएचडी करण्यासाठी त्याने नोकरी सोडली आहे. क्रिकेटपटूच्यावतीने त्याच्या व्यवस्थापकांनी याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर विभागाकडे तक्रार केली होती. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर ट्विटरवरून आरोपीने क्रिकेटपटूच्या कुटंबीयांबद्दल २४ ऑक्टोबरला आक्षेपार्ह ट्वीट केले होते. याप्रकरणी ८ नोव्हेंबरला दाखल झालेल्या गुन्ह्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता आरोपी हैदराबादमधील रंगारेड्डी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले.  स्वत:ची ओळख लवपण्यासाठी आरोपीने दुसऱ्या नावाचा वापर केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Arrested for making offensive tweets about cricketer family akp

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या