पोलीस शिपायाशी वाद घालून धक्काबुक्की करणाऱ्या शुभम विरेंद्र मिश्रा या २६ वर्षीय तरुणाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली.सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. विशाल नाईक हे ओशिवरा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. जोगेश्‍वरीतील आदर्शनगर परिसरात काही तरुणांमध्ये भांडण सुरु असल्याची माहिती मिळताच पोलीस पथक तिथे गेले.

हेही वाचा>>>मुंबई: समृद्धीवर फूड प्लाझा आणि इतर सुविधांसाठी किमान वर्षभराची प्रतीक्षा?

Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर
mumbai crime news, mumbai rape news
मुंबई: अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरूणाला अटक
Fugitive accused in Mephedrone smuggling case is arrested
आईला भेटायला आला अन् जाळ्यात अडकला; मेफेड्रोन तस्करी प्रकरणात फरार आरोपीला अटक

त्यावेळी रस्त्यावर भांडणार्‍या दोन तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना तिथे शुभम मिश्रा आला आणि त्याने पोलिसांशी आक्षेपार्ह भाषेत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. नाईक यांना जोरात ठोसा मारला. या घटनेनंतर मिश्रा याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भादवीच्या कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच त्याला अटक केली.