आर्थिक निधी उभारण्याच्या उद्देशानेही कलावंत एकत्र

मुंबई : करोनाविरुद्धच्या लढय़ात कलावंत आपापल्या परीने सहकार्य करत आहेत. गाणे-लघुपट या माध्यमांतून इतरांना प्रेरणा देण्याबरोबरच या आपत्तीशी लढताना जास्तीत जास्त आर्थिक निधी उभारण्याच्या उद्देशानेही कलावंत एकत्र येत आहेत. अशा प्रकारे पंतप्रधान साहाय्यता निधीसाठी मदत उभारावी या विचाराने निर्माता-अभिनेता जे. डी. मजेठिया यांनी एक वेगळी शक्कल लढवली असून यात खुद्द कलाकारच लोकांना त्यांच्या ‘फॅ न’च्या रूपात भेटणार आहेत.

मजेठिया यांनी ‘फॅ न का फॅ न’ नामक संके तस्थळाची निर्मिती के ली आहे. या संके तस्थळाच्या माध्यमातून टेलिव्हिजनशी जोडलेल्या अनेक प्रेक्षकांना करोना आपत्तीच्या काळात निधी देण्यासाठी आवाहन के ले जाणार आहे. जे लोक आर्थिक योगदान देतील, त्यांना त्यांचे आवडते कलाकार ‘फॅ न’ म्हणून व्हिडीओ पाठवून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. या

उपक्रमात टेलिव्हिजनचे अनेक नामवंत कलाकार सहभागी झाले असल्याची माहिती मजेठिया यांनी दिली आहे.

करोनाच्या या आपत्तीपासून लोक सुरक्षित राहावेत, यासाठी देशभर टाळेबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला हे आपल्या सगळ्यांना चांगले माहिती आहे. या निर्णयामुळे देशावर मोठे संकट कोसळले आहे, यातही आर्थिक संकट फार मोठे आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना याचा फटका बसणार आहे. जर देशातील अनेकांना याचा फटका बसणार  असेल तर अनेकांनी पुढे येऊन मोठय़ा प्रमाणावर या संकटाशी दोन हात करायला हवेत. लोकांपर्यंत हे विचार पोहोचवण्याची प्रतिभा कलाकारांकडे असते. त्यामुळे कलाकारांच्या मदतीने हा अभिनव उपक्रम हाती घेतला असल्याचे मजेठिया यांनी सांगितले. या उपक्रमात दिव्यांका त्रिपाठी, भारती सिंग, गौतम रोडे, रित्विक धनजानी, करण ग्रोव्हर, शुभांगी अत्रे, सुमित राघवन, रुपाली गांगुली, तेजस्वी प्रकाश, रोहिताश गौड अशी टेलिव्हिजनच्या नामवंत कलाकारांची मांदियाळी सहभागी झाली आहे.