अरुण शौरी यांचे व्याख्यान

मुंबईच्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने उद्या शुक्रवार, ६ डिसेंबर २०१३ सायंकाळी ५:३० वा. ख्तातनाम विचारवंत, लेखक, पत्रकार, अर्थतज्ञ आणि माज निर्गुंतवणूक, टेलिकॉम आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून…

मुंबईच्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने उद्या शुक्रवार, ६ डिसेंबर २०१३ सायंकाळी ५:३० वा. ख्तातनाम विचारवंत, लेखक, पत्रकार, अर्थतज्ञ आणि माज निर्गुंतवणूक, टेलिकॉम आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून काम पाहिलेल्या अरूण शौरींचे Governance Deficit: Why India needs to ─ and how it can ─ bridge the troubling gap between its potential and performance या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. हे व्याख्यान चर्चगेटच्या के .सी. कॉलेजच्या सभागृहात होणार असून ते सर्वांसाठी खुले आहे. आपल्या देदिप्यमान कारकिर्दीत त्यांनी उच्चपदस्थांच्या तसेच बड्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढली व परिणामी संबंधित व्यक्तींना राजीनामा देणे भाग पडले. शौरींनी २६ पुस्तकं लिहिली असून त्यांना पद्मभूषण, रोमन मॅगसेसे तसेच अन्य अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. वायपेयी सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी मारूती, हिंदुस्थान झिंक, विदेश संचार निगम अशा अनेक सरकारी कंपन्यांचे पारदर्शकतेने निर्गुंतवणूकीकरण केले आणि शासनाने कशा प्रकारे काम करणे अभिप्रेत असते याचा मापदंड उभा केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Arun shourie speech