राज्यात मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे. विशेषत: मुंबई आणि उपनगरांसह राज्याच्या अनेक भागांत काढल्या शोभायात्रा काढण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर गिरगावमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीसह शोभायात्रा काढण्यात आली असून या शोभायात्रेत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारसह शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार टीकास्र सोडलं. टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. हेही वाचा - गलिच्छ राजकारण, तुरटी आणि अणुबॉम्ब..कसं असेल राज ठाकरेंचं आजचं भाषण; संदीप देशपांडे म्हणतात…! काय म्हणाले अरविंद सावंत? आमच्या एका शाखाप्रमुखाने संविधानाच्या प्रतिकृतीसह शोभायात्रेचं आयोजन केलं आहे. भारताचे संविधान आमचा स्वाभिमान आहे. मात्र, याच संविधानावर आज हल्ला करण्यात येत आहे. विशेषत: महाराष्ट्र धर्मावर, मराठी संस्कृतीवर हल्ला करण्यात येत आहे. मराठी भाषेला अद्यापही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. राज्यातील उद्योग बाहेर जात आहे. वस्त्र उद्योगाचं कार्यालयही दिल्लीत हवलण्यात आलं आहे. आज देशात महागाई, महिला अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. शेतकरी, बेरोजगारांचे हाल होत आहे, या प्रश्नांवर आधारीत या शोभायात्रा आहेत, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली. हेही वाचा - मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याची बतावणी करत महिलेची २० लाखांची फसवणूक; गेल्या महिन्याभरातील दुसरी घटना ''केंद्र सरकार महाराष्ट्राची शोभा करतंय'' आजच्या निघालेल्या शोभायात्रांमध्ये राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरील प्रश्न मांडण्यात आले आहे. ही शोभायात्रा बघून आमचा उर भरून येतो. केंद्र सरकार सध्या महाराष्ट्राची शोभा करत आहे. त्यामुळे मराठी माणसाला अंतर्मुख करणारीही शोभायात्रा आहे, असी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.