Mumbai Rave Party : आर्यन खान आणि मुनमुन धमेचाची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव

आर्यन खानने एनडीपीएस न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामिनावर आज विशेष एनडीपीएस न्यायालयाने निर्णय दिला आहे. आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. कॉर्डेलिया क्रूझ येथे छापा टाकल्यानंतर त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. दरम्यान आर्यन खानला विशेष न्यायालयाने चौथ्यांदा जामीन नाकारला आहे. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले. दरम्यान या निर्णयाविरोधात आर्यन खानने एनडीपीएस न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 

मुनमुन धमेचाने देखील विशेष एनडीपीएस न्यायालयाने आज  जामीन फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. उद्या मुंबई उच्च न्यायालयासमोर यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

आर्यन खानच्या वकिलांनी मुंबई विशेष न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते आता उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहे असे म्हटले होते. काही काळासाठी आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागेल.

Aryan Khan case : आर्यन खानच्या अडचणीत वाढ; एनडीपीएस न्यायालयाकडून जामीन नाहीच

सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्यन आणि मर्चंट मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आणि धामेचा भायखळा महिला कारागृहात आहेत. आरोपी आर्यन खान आणि इतरांविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (सी), २० (बी), २७, २८, २९ आणि ३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्यनच्या जामिनावर विशेष नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कोर्टाने बुधवारी निकाल दिला. आर्यन सोबत, क्रूझमधून आणखी सात लोकांना अटक करण्यात आली. यानंतर या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आहे. जामिनावर न्यायालयात गेल्या सुनावणी दरम्यान, एनसीबीने म्हटले की, आर्यन खान गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे ड्रग्ज घेत होता असे पुरावे दर्शवतात. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने असेही म्हटले होते की आर्यनच्या ताब्यातून काहीही सापडले नाही, पण त्याच्या चॅटमधून त्याचा आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे.

याआधी एनसीबीने जामीनाच्या सुनावणीआधी आर्यन खानने एका अभिनेत्रीसोबत ड्रग्जसंबंधी चॅटिंग केल्याची माहिती कोर्टात दिली आहे. एनसीबीने हे संभाषण कोर्टात सादर केलं आहे. गेल्या सुनावणीत एनसीबीने कोर्टात ही माहिती दिली आहे.

एनसीबीने आर्यन खानच्या मोबाइलमधील चॅटिंग तपासलं असून याआधीही अनेक संभाषणांचा उल्लेख केला आहे. दरम्यान यावेळी आर्यन खानने एका नवोदित अभिनेत्रीसोबतही ड्रग्जसंबंधी चॅट केलं होतं असं समोर आलं आहे. २ ऑक्टोबरला झालेल्या क्रूझ पार्टीतल्या ड्रग्जसंबंधी दोघांमध्ये बोलणं झालं होतं. याच पार्टीनंतर आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेत नंतर अटकेची कारवाई केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aryan khan and munmun dhamecha run to the high court for bail srk

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या