क्रूझ पार्टीप्रकरणी गौप्यस्फोट करणारे पंच प्रभाकर साईल मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले आहेत. आपल्या जीवाला धोका असल्यानं संरक्षण मागण्यासाठी पोलिसांकडे आल्याचं साईल यांनी म्हटलंय. दरम्यान, साईल यांच्या मागणीनंतर मुंबई पोलीस त्यांना संरक्षण देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती, त्या क्रूझबाहेर आपण हजर होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता.

किरण गोसावीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर साईलने रविवारी माध्यमांसमोर येत ड्रग्ज प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले होते. साईलने मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. तसेच आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही साईलने केला होता. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचंही साईल यांनी म्हटलंय. आपल्या जीवाला धोका असल्यानं एवढे दिवस गप्प होतो, असा दावा साईल यांनी केला होता.

Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
On the occasion of Prime Minister Narendra Modi visit to Kanhan Nagpur police force on high alert mode Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…
Senas Chandrahar Patil summoned to Mumbai immediately
सेनेच्या चंद्रहार पाटलांना तातडीने मुंबईला पाचारण
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

या प्रकरणातील गौप्यस्फोट करताना पुरावे म्हणून साईलने काही फोटो आणि व्हिडीओ देखील सादर केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये आर्यनला अटक करून एनसीबी कार्यालयात आणल्यानंतर किरण गोसावी आर्यन खानजवळ बसून त्याचं फोनवरून कुणाशी तरी बोलणं करून देत असल्याचं दिसत होतं. दरम्यान, साईल यांच्या भेटीनंतर त्यांना मुंबई पोलीस संरक्षण देणार की नाही हे स्पष्ट होईल.