Video: आर्यन २५ दिवसांनी घरी परतणार म्हणून ‘मन्नत’वर खास तयारी

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला गुरुवारी न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला असून त्यामुळे आता आर्यन घरी परतण्याची तयारी सुरु झालीय

Aryan Khan Gets Bail shahrukh khan home mannat decorated with decorative lighting
जवळपास २५ दिवसाने आर्यन आपल्या घरी म्हणजेच मन्नत बंगल्यावर परतणार

गुरुवारी म्हणजेच २८ ऑक्टोबर २०२१ रोजी आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या प्रकरणामध्ये जामीन मंजूर केला. आज २९ ऑक्टोबर रोजी जवळपास २५ दिवसाने आर्यन आपल्या घरी म्हणजेच मन्नत बंगल्यावर परतणार आहे. आर्यन शुक्रवारी म्हणजे आजच घरी येणार असल्याची शक्यता आहे. अर्थात न्यायालयाचे आदेश आल्यानंतर ते तुरुंग प्रशासनाकडे सादर करुन नंतर औपचारिकता पूर्ण केल्यावरच आर्यनची सुटका होणार असल्याने ती शुक्रवारी रात्री उशीरा होणार की शनिवारी सकाळी याबद्दल ही बातमी करेपर्यंत तरी स्पष्टता झालेले नाही. तरी आर्यनच्या त्याच्या स्वागतासाठी मन्नत बंगल्यावर खास विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. पाहा त्याची काही खास दृष्ये…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aryan khan gets bail shahrukh khan home mannat decorated with decorative lighting scsg

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या