‘एनसीबी’कडून आर्यन खानचे समुपदेशन

सर्वांना आपला गर्व  वाटेल, असेच काम करेन,  असा शब्द आर्यनने समुपदेशनादरम्यान दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.  

मुंबई: क्रुझ पार्टीप्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनचे अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या(एसीबी) कोठडीत असताना समुपदेशन करण्यात आले होते. त्यावेळी इथून बाहेर पडल्यानंतर गरीबांसाठी आर्थिक व सामाजिक काम करण्याचा प्रयत्न करेन. तसेच सर्वांना आपला गर्व  वाटेल, असेच काम करेन,  असा शब्द आर्यनने समुपदेशनादरम्यान दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.   आर्यन खान आर्थर रोड कारागृहात आहे. आर्यनसह मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ र्मचट यांना एनसीबीने  अटक  केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aryan khan s counseling from ncb zws

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख