मुंबई : भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज असलेल्या आशा भोसले या नव्वदीतही तितक्याच उत्साहात आणि सशक्त स्वरात गात ही बाब अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरत होती. वयाच्या या टप्प्यावरही त्यांचा आवाज तरल, नियंत्रित आणि भावपूर्ण राहणे हे केवळ नैसर्गिक देणगी नसून, त्यामागे कठोर शिस्त, सातत्य आणि आरोग्यदायी जीवनशैली दडलेली होती. वाढत्या वयातही त्यांची ऊर्जा, सुरेलता आणि कामावरील निष्ठा कायम राहण्यामागे नेमके काय रहस्य आहे याबाबत त्यांनी स्वतः अनेकदा भाष्य केले आहे.

आशाताईंचे जीवन हे केवळ संगीताच्या यशाची कहाणी नसून निरोगी आणि आनंदी वृद्धत्वाचा आदर्श आहे. शिस्त, सातत्य आणि सकारात्मकता यांच्या जोरावर त्यांनी नव्वदीतही आपले आरोग्य आणि आवाज सांभाळला होता. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेतल्यास प्रत्येकजण वृद्धापकाळातही सशक्त आणि आनंदी जीवन जगू शकतो.गेल्या काही वर्षांत वृद्धापकाळातील आरोग्याच्या समस्या वाढत असताना, आशा भोसले यांचे उदाहरण वेगळेच चित्र समोर आणते. त्यांनी आयुष्यभर पाळलेली साधी जीवनशैली आणि स्वतःवर घेतलेली काळजी यामुळे त्या शेवटपर्यंत कार्यरत होत्या. नियमित दिनक्रम, योग्य आहार आणि मानसिक संतुलन यांचा त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाल्याचे त्यांच्या जवळच्या व्यक्ती सांगतात.

स्वत: आशा भोसले यांच्या मते, त्यांच्या दीर्घकाळ टिकलेल्या सुरेल आवाजामागे सर्वात मोठा घटक म्हणजे दररोजचा रियाज. त्या सातत्याने सराव करत राहिल्या आणि ‘रियाज कधीही सोडला नाही,’ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. वयाच्या नव्वदीतही हा नियम त्यांनी पाळला होता. गाण्याच्या प्रत्येक ओळीतील भावना समजून घेण्यावर त्यांनी विशेष भर दिला, ज्यामुळे त्यांच्या गायकीतला भाव कायम राहिला.आहाराबाबतही त्यांनी शिस्त पाळली. थंड पदार्थ, दही आणि थंड पेये टाळणे, साधा आणि घरगुती आहार घेणे या सवयी त्यांनी जपल्या. ‘आवाज हेच आपले मुख्य साधन आहे, त्यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे आहे,’ असे त्या सांगत असत. आवाज टिकवण्यासाठी त्यांनी लहानसहान गोष्टींकडेही लक्ष दिले. पार्श्वगायक सुदेश भोसले आशातीईंविषयी सांगतात, मी त्यांना कधीही फोन केला तरी मागे तानपुऱ्याचा आवाज येत असे.अगदी पाहाटे कोणत्याही वेळी जाग आली तरी त्या रियाजाला बसत.

याशिवाय, सतत काहीतरी नवीन शिकण्याची त्यांची वृत्तीही त्यांच्या यशामागील मोठा आधार ठरली. विविध संगीतप्रकार आत्मसात करणे, नवीन प्रयोग करणे आणि काळानुसार स्वतःला बदलत ठेवणे, यामुळे त्यांचा आवाज नेहमीच ताजा राहिला. त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या मते, आशा भोसले यांचा उत्साही आणि सकारात्मक स्वभावही त्यांच्या उत्तम आरोग्यामागे महत्त्वाचा घटक होता. कामात आनंद शोधणे, ताणतणावापासून दूर राहणे आणि सतत सक्रिय राहणे, ही त्यांची जीवनशैली होती.एकूणच आशा भोसले यांच्या दीर्घायुष्याचे आणि उत्तम प्रकृतीचे रहस्य कोणत्याही विशेष उपचारात नसून शिस्तबद्ध दिनचर्या, नियमित सराव, साधा आहार आणि कामावरील प्रेम या गोष्टींमध्ये दडलेले असल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या जीवनप्रवासातून आजच्या पिढीला आरोग्य आणि कलेबाबत महत्त्वाचा संदेश मिळतो.

आशा भोसले यांच्या दैनंदिन जीवनात शिस्त ही केंद्रस्थानी आहे. ठराविक वेळेत झोप आणि उठणे, शरीराला पुरेशी विश्रांती देणे आणि अनियमित सवयींपासून दूर राहणे, हे त्यांनी आयुष्यभर जपले. याचबरोबर त्यांचा आहारही अत्यंत संतुलित आहे. घरगुती, ताजे आणि पचायला सोपे अन्न याला त्यांनी नेहमी प्राधान्य दिले. वाढत्या वयात पचनशक्ती कमी होत असताना त्यांनी आहारात संयम ठेवणे हेच आरोग्य टिकवण्याचे महत्त्वाचे साधन ठरले. संगीतक्षेत्रात सक्रिय राहण्यामागे त्यांचा रोजचा रियाज हा मोठा घटक मानला जातो. आशाताईंनी आयुष्यभर आवाजाचा सराव कधीच खंडित होऊ दिला नाही. नियमित सरावामुळे स्वरयंत्र सक्रिय राहते आणि आवाजावर नियंत्रण टिकून राहते, असे संगीततज्ज्ञ सांगतात.

मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही त्यांची भूमिका ठळक आहे. सकारात्मक विचारसरणी, ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न आणि कामात सतत गुंतलेले राहणे, यामुळे त्यांची मानसिक ताकद वृद्धापकाळातही अबाधित राहिली आहे. संशोधनानुसार, आनंदी आणि सक्रिय राहणाऱ्या व्यक्तींमध्ये आजारांचे प्रमाण कमी असते.याचाच प्रत्यय त्यांच्या आयुष्यातून येतो.तज्ज्ञांच्या मते आशा भोसले यांचे उदाहरण हे आजच्या वृद्धत्वाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडवणारे आहे. वाढते वय म्हणजे केवळ आजार आणि अशक्तपणा असे समीकरण मोडून काढत त्यांनी ‘सक्रिय वृद्धत्व’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

वृद्धापकाळात आरोग्य उत्तम राखण्यासाठी काही मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करता येत नाही. यात नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, दररोजचा हलका व्यायाम किंवा योग, तसेच पुरेशी झोप या गोष्टी अत्यावश्यक ठरतात. याशिवाय, कुटुंबीयांशी संवाद ठेवणे, छंद जोपासणे आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहणे, यामुळे मानसिक स्वास्थ्यही टिकून राहते.व्यसनांपासून दूर राहणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मद्यपान आणि धूम्रपान यांसारख्या सवयी वृद्धापकाळात गंभीर आजारांना आमंत्रण देतात. त्यामुळे आरोग्यपूर्ण सवयी अंगीकारणे आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात.एकूणच आशाताईंचे जीवन हे केवळ संगीताच्या यशाची कहाणी नसून, निरोगी आणि आनंदी वृद्धत्वाचा आदर्श आहे. शिस्त, सातत्य व सकारात्मकता यांच्या जोरावर त्यांनी नव्वदीतही आपले आरोग्य आणि आवाज सांभाळला आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेतल्यास प्रत्येकजण वृद्धापकाळातही सशक्त आणि आनंदी जीवन जगू शकतो, असे स्पष्ट होत आहे.