…तर महिलांना साडेसाती कशी काय येते? – आशा भोसले

स्त्री मंदिरात आलेली चालणार नाही, असे कोणत्या देवाने सांगून ठेवले आहे

Asha bhosle , women entry in temples , shani shingnapur, trupti desai, महिलांना प्रवेशबंदी , Maharashtra, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Asha bhosle : शनीला स्त्रिया चालत नसतील तर मग साडेसातीमध्ये तो स्त्रियांना सोडून पुरूषांच्याच डोक्यावर का बसत नाही?, अशी शंकाही यावेळी आशा भोसले यांनी उपस्थित केली.

महिलांना सर्व मंदिरांमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे, असे मत जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केले. शनिशिंगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशबंदी आहे. जर असे असेल तर महिलांना साडेसाती कशी येऊ शकते, असा सवाल आशा भोसले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केला. शनीची साडेसाती सर्वांनाच भोगावी लागते. शनीला स्त्रिया चालत नसतील तर मग साडेसातीमध्ये तो स्त्रियांना सोडून पुरूषांच्याच डोक्यावर का बसत नाही?, अशी शंकाही यावेळी आशा भोसले यांनी उपस्थित केली. स्त्री मंदिरात आलेली चालणार नाही, असे कोणत्या देवाने सांगून ठेवले आहे? हे सर्व नियम पुरूषांनी काढले आहेत आणि ते स्त्रियांच्या विरुद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

शनीचं तेल धार्मिकतेवर
भेदण्या शनिमंडला.. 
परंपरांचं संमोहन! 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Asha bhosle on women entry in temples

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या