शिवसेनेच्या ठाकरे गटाने पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. “भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण फडणवीसांमध्ये दिसते”, असं म्हणत ठाकरे गटाने शाब्दिक हल्ला चढवला. यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी या टीकेला प्रत्युत्तर देत तुम्ही टोमणे, कुजकटपणा सोडा, तोंडे बंद ठेवा, असं म्हटलं. शेलार यांनी शनिवारी (१९ ऑगस्ट) निवेदन जारी करत भूमिका स्पष्ट केली.

आशिष शेलार म्हणाले, “महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाचे नेते असो वा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री असो आपल्याला मिळालेले प्रत्येक पद, जबाबदारी मानून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘एसटीपेक्षा’ जास्त फिरून गरीब, कष्टकरी, सामान्य माणूस, शेतकरी, श्रमिकांचे अश्रू पुसणारे, त्यांचे प्रश्न सोडवणारे, महाराष्ट्राच्या विकासासाठी दिवसरात्र काम करणारे देवेंद्र फडणवीस हे आज ‘मुख्य’ असले काय आणि ‘उप’ असले काय, ते स्वयंसेवक आहेत. त्यांना काम करण्यासाठी तुमच्यासारखी ‘प्रमुख’ पदे लागत नाहीत. त्यामुळे देवेंद्रजींची कुणी ‘घरबशांनी’ शिकवणी घेण्याची गरज नाही.”

Navi Mumbai Semiconductor Project, Eknath Shinde,
राज्यात आमचेच सरकार असणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
Devendra Fadnavis Rebuttal to Sanjay Raut
“हिंदूत्त्वाला विरोध करता-करता..”, माजी सरन्यायाधीश आणि मनमोहन सिंग यांचे फोटो दाखवत देवेंद्र फडणवीसांची टीका
Mamata Banerjee is aggressive in the Assembly on the safety of women
विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
sambhaji brigade workers staged a strong protest in front of sculptor jaideep apte house in kalyan
शिल्पकार जयदीप आपटे यांच्या कल्याणमधील घराला काळे फासले; संभाजी ब्रिगेडची आपटेंच्या घरासमोर निदर्शने
Himanta Biswa Sarma
CM Himanta Sarma : “आसामला धमकवण्याची तुमची हिंमत कशी झाली?” ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ विधानवरून मुख्यमंत्री सरमा यांचा हल्लाबोल!
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…

“तुम्ही टोमणे, कुजकटपणा सोडा, तोंडे बंद ठेवा”

“अग्रलेखातून टोमणे मारणाऱ्यांना लक्षात आणून देतो. अहो, फडणवीस गृहमंत्री आहेत. “गृहबसे” “मुख्य”मंत्री नाहीत, हे विसरू नका. ‘फडणवीस सांभाळा’ असा अग्रलेखातून सल्ला देणाऱ्यांना आम्ही सांगतोय तुम्ही टोमणे, कुजकटपणा सोडा, तोंडे बंद ठेवा, जमलं तर अजून तुमच्या पत्रकार पोपटलाल यांना आवरा नाही, तर नॅनोत मावेल एवढाच पक्ष उरेल,” असं आशिष शेलारांनी म्हटलं.

“तुम्ही अद्याप अर्धग्लानी अवस्थेतून बाहेर आलेले नाहीत”

आशिष शेलार पुढे म्हणाले, “‘मुख्य’ होण्याची हाव, हव्यास, हावरटपणा, हपापलेपण हे कुणाचे होते, त्यांनी ते कपटाने कसे मिळवले ही काळी पाने दुर्दैवाने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात तुमच्या नावाने लिहिली आहेत. स्वतः म्हणजे? होय होय मर्दासारखे स्वतः च ‘मुख्य’ असताना पक्षाचे ४० आमदार १२ खासदार पक्ष सोडतात, नगरसेवक, मंत्री, कार्यकर्ते सगळे ‘जय महाराष्ट्र’ करुन निघून जातात. तुम्ही अद्याप त्या अर्धग्लानी अवस्थेतून बाहेर आलेले नाहीत. त्या अवस्थेत असल्यानेच तुम्हाला आपली गेलेली ‘मुख्य’ अवस्था सतावते आहे.”

“तुमचे ‘पत्रकार पोपटलाल’ उठसूट सामनातून टीका करतात”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुमच्या टीकेचे विषय आहेत. तुम्ही आणि तुमचे संपादक महर्षी ‘पत्रकार पोपटलाल’ उठसूट सामनातून टीका करता, पण लक्षात ठेवा आम्ही एका संस्कारातून आलेले आहोत. संघ शाखेत आम्ही जे शिकलो ते तुम्ही न शिकल्याने तुमची ही अवस्था झाली आहे”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

हेही वाचा : “भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण फडणवीसांमध्ये…”; ठाकरे गटाचा हल्लाबोल, म्हणाले…

“भांग कधी चढते आणि कधी उतरते, देशी कशी चढते आणि…”

“भांग कधी चढते आणि कधी उतरते, देशी कशी चढते आणि कशी उतरते याचा अनुभव आम्हाला नाही. ज्यांना ती नशा माहिती आहे, त्यांनीच त्याची महती सांगितलेली बरी. आमच्याकडे अहंकाराची “देशी” नशा उतरवण्याचे औषध आहे. ते ज्यांना लागू पडलेय ते सध्या ग्लानीत बडबडत आहेत,” असं म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं.

“मालवणी शब्दांच्या तलवारी आम्हाला काढायला लावू नका”

“‘कापराचे भाग्य मजसी अनुभवा आणून दे, उसळत्या रक्तात माँ ज्वालामुखीचा दाह दे, वादळाची दे गती, पण भान ध्येयाचे असू दे’, या ओळी म्हणजे आमचा ‘मुख्य’ संस्कार आणि संस्कृती आहे. आम्हाला भान ध्येयाचे आहे, दुसऱ्याला टोमणे मारण्याचे नाही. म्हणून पातळी सोडून आम्ही बोलणार नाही. तरीही तुम्ही ‘मुख्य’ विषय आणि स्वतःची ‘मुख्य’ पातळी सोडून तुमच्या ‘उप’ पातळीवर येणारच असाल, तर आम्ही कोकणातील, अस्सल मालवणी मुलखातील आहोत. मालवणी शब्दांच्या तलवारी आम्हाला काढायला लावू नका. एवढाच आजचा तुम्हाला ‘मुख्य’ सल्ला,” असं म्हणत शेलारांनी टोला लगावला.