मुंबई : गेल्या दीड वर्षात लोककलावंत, रंगकर्मी, पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून रंगदेवतेची सेवा करणाऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी केली.

राज्य सरकारने देव आणि भक्तांची, नाटक व चित्रपटप्रेमी आणि रंगदेवतेची ताटातूट केली. त्यामुळे रंगकर्मी आणि मंदिरांबाहेर उदबत्ती, धूप, कापूर, फुले, प्रसाद विकणाऱ्यांची उपासमार झाली. आता मंदिरे आणि नाट्य-चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी दिली, म्हणजे मोठे काही केल्याचा टेंभा सरकारने मिरवू नये. रंगकर्मी, मंदिरांबाहेर रोजीरोटी कमावणारे आणि भाजपच्या दबावामुळे अखेर सरकारला हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे शेलार यांनी सांगितले.