‘विको’चे संचालक अशोक पेंढरकर यांचे निधन

विको समूहाचे संचालक अशोक केशव पेंढरकर (वय ७२) यांचे शुक्रवारी येथे निधन झाले.

विको समूहाचे संचालक अशोक केशव पेंढरकर (वय ७२) यांचे शुक्रवारी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मधुमती, पुत्र अमित, कन्या रश्मी सहस्रभोजनी व मोठा आप्त परिवार आहे. गजाननराव पेंढरकर यांचे अशोक हे कनिष्ठ बंधू होत. गेल्या काही दिवसांपासून अशोक पेंढरकर किडनी विकाराने आजारी होते. परळ येथील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. भोईवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. विको लेबॉरेटरीज्चा डोंबिवली येथील कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून ते सांभाळत होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ashok pendharkar passed away

ताज्या बातम्या