मुंबई : गेल्या पाच दशकांहून अधिक काळ राज्य व देश पातळीवरील विविध क्षेत्रांत कार्यकर्तृत्व गाजवलेले  माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे  तयार करण्यात आलेल्या ‘अष्टावधानी ’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन येत्या बुधवारी दि. २९ रोजी होत आहे. ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार असून, त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

शरद पवार यांनी अनेक क्षेत्रांत मूलभूत स्वरूपाचे काम केले आहे. या क्षेत्रांमधील नामवंतांनी त्यांच्या या कार्याबद्दल केलेल्या लेखांचे संकलन या विशेष पुस्तकात करण्यात आले आहे. राजकारणात सलग पाच दशकांहून अधिक काळ लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणून शरद पवार यांनी त्या काळात चार वेळा मुख्यमंत्रिपदासह केंद्रातही मंत्री म्हणून काम केले. याबरोबरच समाजकारण, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, कृषी, प्रशासन या क्षेत्रातही पवार यांचा स्वतंत्र ठसा उमटला आहे.  या सर्व क्षेत्रांतील अनुभवी आणि ज्येष्ठांनी पवार यांच्या त्या त्या क्षेत्रातील कार्याचे मूल्यमापन करणारे लेख या विशेष पुस्तकासाठी लिहिले आहेत. या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त शरद पवार यांची प्रकट मुलाखतही घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम विशेष निमंत्रितांसाठीच आहे.

nashik, Fraud Case Registered Against Panjarpol , Nashik Panjarpol Sanstha Managers, Forged Letter, Allegedly Signed by Chief Minister, land acquisition panjrapole nashik, panjrapole nashik fraud, forged letter cm eknath shinde,
भूसंपादन प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे बनावटपत्र, श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
ED action on assets worth 36 crores in Wadhwaan embezzlement case
मुंबई : वाधवान गैरव्यवहार प्रकरणात ३६ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

टायटल पार्टनर : एस.एस. इंजिनियर्स

असोसिएट पार्टनर :

अमानोरा पार्क टाउन

मगरपट्टा सिटी ग्रुप

पॉवर्ड बाय : इंडियाना सुक्रो-टेक (पुणे) प्रा. लि. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,

पुणे सुरतवाला बिझिनेस ग्रुप