scorecardresearch

Premium

उद्योगपती नेस वाडियाविरोधात चालकाची मारहाणीची तक्रार

धीरेंद्र मिश्रा (३३) गेल्या तीन वर्षांपासून नेस वाडिया यांच्या गाडीचा चालक म्हणून काम करत आहे.

उद्योगपती नेस वाडियाविरोधात आता त्यांच्या गाडीचालकाने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आहे. वाडिया यांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार चालकाने सीएसटी येथील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दाखल केली असून सिग्नल न तोडणे, वेगात गाडी न चालविल्याने वाडिया यांनी अनेकदा आपल्याला कानशिलात भडकावल्याची तक्रार दाखल केली आहे.

धीरेंद्र मिश्रा (३३) गेल्या तीन वर्षांपासून नेस वाडिया यांच्या गाडीचा चालक म्हणून काम करत आहे. बुधवारी वाडिया यांना फोर्ट परिसरात एका बैठकीसाठी जायचे होते. लवकर पोहोचण्यासाठी वाडिया यांनी मिश्राला गाडी वेगाने चालविण्यास सांगितले. तसेच वाटेत सिग्नल लागल्यास तो तोडण्यास बजावले. मात्र, मिश्रा याने गाडी नियंत्रणात चालवली. जेजे उड्डाणपूल ओलांडल्यानंतर एकदा सांगूनही कळत नाही का, गाडी धिम्या गतीने का चालवतोस, असे म्हणत वाडिया यांनी मिश्राला शिव्यांची लाखोली वाहण्यास सुरुवात केली. शेवटी चिडलेल्या मिश्रा याने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्या वेळी गाडीतून उतरवून वाडिया गाडी घेऊन निघून गेले. मिश्राने त्यानंतर माता रमाबाई पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकाराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली.  अदखलपात्र गुन्हय़ाची नोंद केल्याचे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉ. मनोज शर्मा यांनी सांगितले. २०१४ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या वानखेडे स्टेडिअमवर सामन्यादरम्यान त्यांनी मैत्रीण प्रीती झिंटा हिला मारहाण  केली होती. त्या प्रकरणात वाडिया यांच्याविरोधात मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

PM Modi Mumbai Fire
Goregaon Building Fire : मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून मदत जाहीर, पंतप्रधान मोदी म्हणाले…
huge employees crowd in pension court of guardian minister mangal prabhat lodha
मुंबई: पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पेन्शन अदालतमध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी; ३५० निवृत्त कर्मचाऱ्यांनी मांडली गाऱ्हाणी
Female drug trafficker arrested with MD
महिला ड्रग्स तस्कराला ३६ लाखांच्या एमडीसह अटक, पूर्वी देहव्यापार व्यवसायात…
Gambling dens of office bearers
खळबळजनक! विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे जुगार अड्डे

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Assaulted complaint against ness wadia

First published on: 20-05-2016 at 00:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×