मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट बसच्या जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त, प्रशासक भूषण गगराणी यांनी बेस्ट उपक्रमाला मतदानाच्या दिवशी जादा बस फेऱ्या चालविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे २० नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत बस सेवा उपलब्ध असणार आहे. तसेच दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बसही उपलब्ध असणार आहे.

मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग, वयवर्षे ८५ पेक्षा अधिक ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचता यावे यासाठी बेस्ट उपक्रमाची बस सेवा सज्ज असणार आहे. या सेवेसाठी मतदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तसेच ही सेवा मुंबई शहरांसह दोन्ही उपनगरांत उपलब्ध असणार आहे. तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांना वेळेवर कर्तव्यावर पोहचता यावे यासाठी जादा बेस्ट सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. बेस्ट बससह मेट्रो, मध्य आणि पश्चिम रेल्वेची सेवी उशीरापर्यंत उपलब्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी जादा बस फेऱ्यांचे नियोजन सोमवारपर्यंत केले जाईल, असे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader