Premium

कांदिवली येथे कुत्र्याच्या पिल्लाला वीष देऊन मारले; गुन्हा दाखल

कांदिवली पश्चिम येथे कुत्र्याच्या पिल्लाला विषारी औषध देऊन मारण्याचा प्रकार गुरूवारी घडला असून याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

pv dog
संग्रहित छायाचित्र

मुंबईः कांदिवली पश्चिम येथे कुत्र्याच्या पिल्लाला विषारी औषध देऊन मारण्याचा प्रकार गुरूवारी घडला असून याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार माधवी शेट्ट्ये या कांदिवली येथील रहिवासी आहेत. त्या परिसरातील रस्त्यावर राहणाऱ्या कुत्र्यांना खायला घालतात. ते राहात असलेल्या जीवन आशा सोसायटीसमोर एक कुत्री व तिच्या सहा पिल्लांना त्या खायला घालायच्या. त्यातील एक पिल्लू गुरुवारी रस्त्यावर निपचित पडले होते. पिल्लाला कोणीतरी मारल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता पिल्लाच्या अंगावर कोणीही जखम नव्हती. त्यामुळे पिल्लाला कोणीतरी औषध देऊन मारल्याचा त्यांना संशय आला. अखेर वैद्यकीय तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शेट्ट्ये यांनी याप्रकरणी कांदिवली पोलिसांकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार भादंवि व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदयांतर्गत कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसी टीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: At kandivali puppy killed disguise filed case mumbai print news ysh

First published on: 12-08-2022 at 12:37 IST
Next Story
पेट्रोल-डिझेल भेसळ घोटाळा : तेलगीच्या सहआरोपीची गुन्ह्याची कबुली