वीज बचत करणाऱ्या पंख्यासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय नवउद्योजक पुरस्कार

भन्नाट कल्पनांच्या बळावर अभियांत्रिकीत ‘जुगाड’ करून उत्पादने बाजारात आणणाऱ्या अनेक कंपन्या आयआयटियन्सनी उभ्या केल्या आहेत. यातीलच ‘अ‍ॅटोमबर्ग’ या एका कंपनीने वीज बचत करणारा पंखा बनवून विकसनशील देशाला वीज बचतीचा नवा मंत्र दिला. त्यांच्या या कामाचा सन्मान म्हणून दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय उद्योग पुरस्कार समारंभांत सर्वोत्कृष्ट नवउद्योजक म्हणून गौरविण्यात आले.

Loksatta Lokrang Maharashtra Foundation is recognized in Maharashtra for awards in literary and social fields
पंचम देणे सामाजिक जाणिवेचे !
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान
kangana ranaut career movies
१६ व्या वर्षी घर सोडणारी ‘धाकड’ कंगना रणौत बॉलीवूडची ‘क्वीन’ झाली, पण…

घरातला टीव्ही, फ्रिज, मायक्रोव्हेव ओव्हन स्मार्ट झाले, मात्र  पंख्यावर मात्र काहीच संशोधन झाले नाही. हीच बाब ‘अ‍ॅटोमबर्ग’ या कंपनीचे संस्थापक आणि आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी मनोज मीना यांनी हेरली. बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या पंख्यांपेक्षा वेगळा असा वीज बचत करणारा पंखा विकसित करण्याचे ठरविले. त्यांनी ते ध्येय साकारले आणि दोन वर्षांत तब्बल एक लाख पंख्यांची विक्री करून सुमारे १५ गिगा वॉट तास वीज बचत करत देशातील वीज बचतीच्या मोहिमेला हातभार लावला. त्यांच्या या संशोधनाचा मोठा सामाजिक फायदा असल्यामुळेच त्यांना सर्वोत्कृष्ट नवउद्योग म्हणून अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पध्रेसाठी देशभरातील हजारो नवउद्योगांनी अर्ज केले होते, त्यातून या उद्योगाची निवड झाली. या नवउद्योगाची बीजे आयआयटी मुंबईच्या संकुलात रोवली गेली. त्याला आयआयटी मुंबईतील प्राध्यापक मिलिंद अत्रे यांनी मार्गदर्शन केले. इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी शाखेत पदवीधर असलेले मनोज  यांना मोटार अभियांत्रिकीमध्ये विशेष रस होता. यामुळे त्यांनी २०१२मध्ये मोटार विकसित करून देणाऱ्या ‘अ‍ॅटोमबर्ग’ या कंपनीची स्थापना केली. या कंपनीतर्फे सुरुवातीला इस्रो, आयआयटी अशा विविध संस्थांमध्ये आवश्यक ती यंत्रे विकसित करून देण्याच्या कामास सुरुवात केली. हे काम करत असताना त्यांना घरगुती वापरातील उपकरणांमध्ये संशोधन करून त्यामध्ये काहीतरी नवीन करण्याची कल्पना सुचली.मग त्यांनी पंख्यात वापरण्यात येणारी इंडक्शन मोटर बदलून त्या जागी अत्याधुनिक मोटर बसवली. प्रायोगिक तत्त्वावर एक पंखा तयार करून त्याचे आयआयटीच्या प्रयोगशाळेत परीक्षण केले आणि आवश्यक ते बदल करून पंखा बाजारात विक्रीसाठी आणला. गोरिला पंखा असे या पंख्याचे नाव असून सुरुवातीला तो केवळ संस्थांमध्येच विकला जात होता. साध्या पंख्याला ७० वॅट लागणारी वीज गोरिला पंख्याला अवघी २० व्ॉट इतकीच लागते. यामुळे वर्षांला १५०० ते २००० रुपयांची वीजबचत होत असल्याचे कंपनीचे संस्थापक मनोज यांनी सांगितले. अवघ्या पाच जणांनी सुरू केलेल्या या कंपनीमध्ये सध्या ११० कर्मचारी काम करत आहेत. आता त्यांचा हा पंख अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या संकेतस्थळांवरही उपलब्ध आहे. पंख्याची वाढती मागणी लक्षात घेता कंपनीने महिन्याला दहा हजार पंख्याचे उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे.

निर्यातही सुरू

नेपाळ, नायजेरिया यासारख्या विकसनशील देशांमध्ये जेथे विजेची समस्या मोठय़ा प्रमाणावर आहे अशा देशांमध्ये या पंख्याची निर्यात सुरू झाली आहे. यामुळे मनोज यांच्या कंपनीला जागतिक पातळीवरही गौरविण्यात आले आहे. यामध्ये संयुक्त राष्ट्रातर्फे वीज बचत करणाऱ्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचाही समावेश आहे.