वंचित बहुजन युवक आघाडी मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर शनिवारी ( २७ मे ) प्राणघातक हल्ला करण्यात आला. आंबेडकर भवन परिसरात झालेल्या प्रकाराने एकच खळबळ उडाली. या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, याला चोख प्रत्युत्तर देणार, असा इशारा वंचित युवा आघाडीने दिला आहे.

मुंबईत वंचित बहुजन आघाडीची सभा होणार आहे. त्यासाठी शनिवारी आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्या कार्यकर्त्यांची बैठक होती. त्याला कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात आले होते. तेव्हा सायंकाळी परमेश्वर रणशूर आणि गौतम हराळ यांच्यावर चार अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड, आणि तलवार, चॉपरने जीवघेणा हल्ला केला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा : मिठीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याचा पालिकेचा दावा, दररोज ८० लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प कार्यरत

पण, हा हल्ला परमेश्वर रणशूरवर नसून हा आंबेडकर भवनावर आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द बोलून आंबेडकर घराण्यासंबंधी अपशब्द बोलणाऱ्या जगदीश गायकवाड आणि टोळीचा हल्यात सहभागी असल्याचा आरोप युवा आघाडीने केला आहे.

हेही वाचा : वाहनांच्या वेगावर लवकरच नियंत्रण, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ‘एचटीएमएस’अंतर्गत कामे अंतिम टप्प्यात

युवा आघाडीकडून सर्व पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात येणार आहे. दोन दिवसांत जगदीश गायकवाडवर कार्यवाही न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा वंचित युवा आघाडीने दिला.

Story img Loader