मुंबई : मराठी नामफलक प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी दुकानदारांचे प्रयत्न | Attempts by shopkeepers to avoid action in Marathi nameplate case mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई : मराठी नामफलक प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी दुकानदारांचे प्रयत्न

मराठी नामफलक नसलेल्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने तयारी सुरू केली

मुंबई : मराठी नामफलक प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी दुकानदारांचे प्रयत्न
मराठी नामफलक प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी दुकानदारांचे प्रयत्न

मराठी नामफलक नसलेल्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने तयारी सुरू केली असून ही कारवाई टाळण्यासाठी दुकानदारांच्या संघटनेने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाची नवरात्रौत्सवाची सुट्टी संपेपर्यंत दुकानांविरुद्ध कारवाई करू नये, अशी मागणी फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा >>> उपसचिवाच्या हस्तक्षेपामुळे म्हाडातील बदल्या शासनाकडेच!

दुकानांवर ठळक अक्षरात मराठी नामफलक लावण्यासाठी दिलेली मुदतवाढ गेल्या आठवड्यात संपल्यानंतर सगळ्यांचेच मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. महानगरपालिकेने कारवाईचा आराखडा तयार केला असून आयुक्तांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे दुकानदारांच्या संघटनेने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयातून या कारवाईला स्थगिती मिळवण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. यापूर्वी उच्च न्यायालयानेही दुकानदारांची याचिका फेटाळून लावलेली होती. त्याला आव्हान देणारी याचिका यापूर्वीच संघटनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे, त्याचबरोबर आता मराठी नामफलकांच्या निर्णयाला विरोध करणारी वेगळी याचिका दाखल करण्यात आली आहे. या दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. सध्या न्यायालयाला नवरात्रौत्सवानिमित्त सुटी आहे. त्यामुळे सुट्टीनंतर न्यायालय सुरू होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी संघटनेने मुख्यमंत्री व आयुक्तांकडे केली आहे.

हेही वाचा >>> ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’; सर्वाधिक महसूल मिळविणारी देशातील पहिलीच लहान मार्गिका

राज्य सरकारने मार्च महिन्यात सर्व दुकाने, आस्थापनांवर मराठी भाषेत फलक लावणे बंधनकारक करणाचा निर्णय घेतला होता. मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबईत त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र व्यापाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन महानगरपालिकेने या निर्णयाच्या अंमलबजावणीला चार वेळा मुदतवाढ दिली होती. चौथ्यांदा दिलेली मुदतवाढ शुक्रवार, ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात आली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
उपसचिवाच्या हस्तक्षेपामुळे म्हाडातील बदल्या शासनाकडेच!

संबंधित बातम्या

मुंबई विमानतळावर ‘सर्व्हर डाऊन’, प्रवाशांच्या लांबच लांब रांगा
विश्लेषण: डोंगर आणि तलावाखालून जाणारा मुंबई-पुणे द्रुतगती बोगदा कसा आहे? त्याचा फायदा काय होईल?
‘तो’ कबुतराचं मांस चिकन म्हणून हॉटेल्सला विकायचा; मुंबईमधील धक्कादायक प्रकार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
“…तोपर्यंत भाजपाचा कुठलाही नेता उभ्या महाराष्ट्रात फिरू शकणार नाही”, शिवसेनेचा जाहीर इशारा
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शिवडी-वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाला गती

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘द काश्मीर फाइल्स’ला ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ म्हणणाऱ्या लॅपिड यांनी मागितली माफी; म्हणाले, “काश्मिरी पंडितांचा…”
बनावट आधार, पॅनकार्डव्दारे १८ कोटींचा वस्तू व सेवाकरचा घोटाळा उघड; गुजरातचे व्यापारी कोठडीत
FIFA WC 2022: मोरोक्कोच्या जादुई दोन गोलमुळे कॅनडा आणि बेल्जियम विश्वचषकातून बाहेर, क्रोएशिया बाद फेरीत दाखल
Gujarat Election: काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढींच्या जाहीर सभेत गोंधळ, AIMIM वर टीका करताच…
“MPSC त उत्तीर्ण नाही झाला तरी गावाकडे…”, गोपीचंद पडळकरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला