अबू आझमीची आणि त्याच्या बोलवत्या धन्याची चौकशी करा – भातखळकर

गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्र पाठवून मागणी केली असल्याची दिली माहिती.

संग्रहीत

“घर घर से बाहर निकलो, कोहराम मचा दो, मोदी तेरी राख कर देंगे.. अशी चिथावणीखोर भाषा वापरणाऱ्या अबू आझमीची आणि त्याच्या बोलवत्या धन्याची चौकशी करा, अशी विनंती मी गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे केली आहे.” असं भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सांगितलं आहे.

“दिल्लीत काल झालेल्या हिंसाचाराचा कनेक्शन, परवा मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या भाषणाशी आहे की नाही, याची चौकशी करण्याची मागणी, मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे. आझाद मैदानावरील भाषणात अबू आझमींनी किसान कायद्याविषयी बोलण्या ऐवजी, अत्यंत चिथावणीखोरपणाचं भाषण केलं. नरेंद्र मोदी तेरी राख हो जाएगी, घर घर से बाहर निकलो, कोहराम मचा दो… या पेक्षाही भडकाऊ भाषण त्यांनी केलं. अबू आझमीच्या या भाषणामागचा बोलवता धनी कोण आहे? व्यासपीठावर बसलेले राष्ट्रवादी व काँग्रेसेचे नेते आहेत. की त्याच्या बाहेर बसलेली कुणी लोकं होती. याची देखील चौकशी करावी अशी मागणी मी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.” असं भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा- “तुमची तोंडं का शिवली आहेत?,” आशिष शेलार शरद पवार आणि संजय राऊतांवर संतापले

केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी  मुंबईतील आझाद मैदनात संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात राज्यभरातील  हजारो शेतकरी एकत्र आले होते. त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करण्यसाठी राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अबू आझमी यांची देखील उपस्थिती होती. यावेळी अबू आझमी यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर जोरदार टीक करत, शेतकऱ्यांना आंदोलन अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर  अबू आझमी यांचा बोलवात धनी कोण आहे? याची चौकशी करण्याची मागणी आज भातखळकर यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केल्याचे समोर आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Atul bhatkhalkar criticizes kelly abu azmi msr