Audi Ola Accident drivers Fight : मुंबईतील पार्कसाइट पोलिसांनी २४ वर्षीय ओला चालकाला मारहाण केल्याप्रकरणी घाटकोपरमधील रहिवासी बिभाष चक्रवर्ती आणि त्याची पत्नी अंतरा घोष यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की एका मारुती अर्टिगा कारने ऑडी कारला हलकी धडक दिली. ज्यामध्ये ऑडीला किरकोळ स्क्रॅच आलेले असू शकतात. मात्र या धडकेनंतर ऑडी कारमधील तरुण बिभाष कारमधून उतरला. त्याने मागे जाऊन ओला कारचालकाशी वाद सुरू केला. त्यानंतर बिभाषने ओला कारचालकाच्या कानशिलात लगावली आणि त्याला उचलून जमिनीवर आपटलं.

ही घटना १९ ऑगस्टची आहे. मात्र या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता व्हायरल होऊ लागला आहे. बिभाषने ओला कारचालकाला जबर मारहाणही केली. या मारहाणीत कारचालक कयामुद्दीन कुरैशी जखमी झाला आहे. मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात कुरैशीवर उपचार केले जात आहेत. घटनेच्या दोन दिवसांनंतर बुधवारी २१ ऑगस्ट रोजी कुरैशी शुद्धीवर आला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला. याप्रकरणी पोलिसांनी बिभाष चक्रवर्ती याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसतंय की बिभाषने कयामुद्दीन मोइनुद्दीन कुरैशी याच्या कानशिलात लगावली, नंतर त्याला उचलून जमिनीवर आपटलं. बिभाषने कयामुद्दीनला उचलून आपटल्यानंतर कयामुद्दीन बराच वेळ जमिनीवर निपचित पडला होता. त्यानंतर त्याला इतर लोकांनी रुग्णालयात दाखल केलं.

Diwali Sale Honda offers upto 1 lakh discount on honda cars Diwali offers
Diwali Sale: होंडा कंपनीकडून ‘या’ कार्सवर मिळणार तब्बल १ लाखापर्यंत डिस्काउंट, दिवाळी सेलची खास ऑफर जाणून घ्या
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Shah Rukh Khan
आयफा अवॉर्डमधील शाहरुख खानच्या सूत्रसंचालनाचा व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “टेलिप्रॉम्प्टर वापरणे…”
Viral video of auto-rickshaw driver attacks car and used abusive words while fighting for overtaking in pune
VIDEO: “ऐ, आधी काच खाली घे मग पुढचं बोल”, पुण्यात रिक्षाचालकाची दादागिरी; भररस्त्यात काय केलं पाहा
arbaz patel post after nikki tamboli safe bigg boss marathi 5
Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी सुरक्षित होताच अरबाज पटेलची प्रतिक्रिया, म्हणाला…
bigg boss marathi aarya slaps nikki controversy project head ketan mangaonkar
आर्याला घराबाहेर का काढलं? अखेर ‘बिग बॉस’च्या ‘बॉस’ने सोडलं मौन; म्हणाले, “वारंवार फुटेज तपासलं, चर्चा…”
Hardik Pandya Met Agastya After Divorce
Hardik Pandya With Agastya : घटस्फोटानंतर हार्दिक पंड्या पहिल्यांदाच भेटला लेकाला, अगस्त्यच्या भेटीचा गोड VIDEO व्हायरल!
Aarya Jadhao met Yogita Chavan
घराबाहेर झालेली आर्या थेट पोहोचली योगिता चव्हाणच्या घरी; दरवाजात लाडक्या मैत्रिणीला पाहताच…, पाहा व्हिडीओ

हे ही वाचा >> याला म्हणतात माणुसकी! गावकऱ्यांनी साखळी करून वाचवला बकऱ्यांचा जीव, पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले; पाहा Viral Video

नेमकं काय घडलं?

सीसीटीव्ही व्हिडीओत दिसतंय की पांढऱ्या रंगाची ऑडी पुढे जातेय व एक राखाडी रंगाची मारुती अर्टिगा ऑडीच्या मागून येत आहे. त्याचवेळी ऑडीचालकाने ब्रेक मारून कार थांबवली. मात्र मागून येणाऱ्या अर्टिगाचा चालक त्याची कार लगेच थांबवू शकला नाही. अर्टिगाने ऑडीला हलकी धडक दिली. त्यानंतर ऑडीमध्ये बसलेला बिभाष कारमधून उतरला आणि अर्टिगाच्या दिशेने चालू लागला. तोवर कयामुद्दीन देखील अर्टिगामधून उतरला कयामुद्दीन काहीतरी बोलणार येवढ्यात बिभाषने त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्याने कयामुद्दीनला उचलून जमिनीवर आपटलं.

हे ही वाचा >> बापरे! रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या महिलेचा निष्काळजीपणा नडला; आरपीएफ जवान ठरला देवदूत, VIDEO सोशल मीडियावर चर्चेत

घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बिभाषने ओला चालक कयामुद्दीनला जमिनीवर आपटल्यानंतर कयामुद्दीन बेशुद्ध पडला. त्यावेळी बिभाष व त्याची पत्नी बाजूलाच उभे होते. दोघे काहीतरी बोलताना दिसत आहेत. दरम्यान, व्हायरल व्हिडीओ आणि कयामुद्दीनने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी बिभाष व त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.