लोकांपर्यंत विज्ञान पोहोचविण्यासाठी मला हा पुरस्कार देण्यात आला आहे. या निमित्ताने खगोल भौतिकशास्त्राची ओळख महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होईल. विज्ञानाचे शिक्षण घेणारी मुले, विशेषत: मुली खगोलशास्त्राबाबत अधिक विचार करतील आणि या क्षेत्रामध्ये येण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.   ऋता काळे

****

mumbai, Aarey land, to store construction materials, Metro 6
मेट्रो ६ चे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी ‘आरे’तील जमिनीचा वापर
amitabh bachchan marathi news, amitabh bachchan lata mangeshkar marathi news
लतादीदींच्या स्वरात मधाची गोडी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भावना
mumbai university marathi news
परीक्षेस हजर राहूनही गैरहजरचा शिक्का
shivaji park dadar marathi news
शिवाजी पार्कमधील माती काढण्यात अडचणींचा डोंगर

गणित क्षेत्रातील संशोधनासाठी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कारा’ने माझी दखल घेतली आहे. त्यामुळे आणखी काम करण्यासाठी आणि माझे सध्याचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या पुरस्कारामुळे प्रेरणा मिळाली आहे. महेश काकडे

****

सुशासन आणि प्रशासन या क्षेत्रासाठी मला हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे मला माझ्या कार्यक्षेत्रात आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळली आहे. तरुणांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करावे. प्रत्येकाने आपले काम व्यवस्थित केले तर नक्कीच समाजामध्ये चांगला बदल घडेल. निधी चौधरी

****

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत अनेक तरुण विविध क्षेत्रांमध्ये देदीप्यमान कामगिरी करीत आहेत. त्यांची दखल ‘लोकसत्ताच्या तरुण तेजांकित पुरस्कारा’द्वारे घेण्यात येते. मी नवी मुंबई महापालिकेमध्ये कार्यरत आहे. पालिकेच्या संपूर्ण चमूने करोनाच्या काळात केलेले काम आणि स्वच्छ सर्वेक्षणाबाबत केलेल्या कामगिरीची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली. याबद्दल मी लोकसत्ताचे आभार मानतो. यानिमित्ताने लोकसत्ताने एक चांगला पायंडा पाडला आहे. अभिजीत बांगर

****

तरुण उद्योजक म्हणून मला ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ मिळाला आहे. मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिनची योग्य, शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. यासाठी आम्ही एक यंत्र तयार केले असून मासिक पाळीतील स्वच्छता तसेच सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट याविषयी जनजागृती करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. भारतातील ३० कोटी महिलांपर्यंत पोहोचून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे मला आणि माझ्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. आम्ही हे उद्दिष्ट पुढील चार-पाच वर्षांत पूर्ण करू. अजिंक्य धारिया

****

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उपयोग शेती व्यवसायामध्ये कसा होईल, यावर दीड-दोन वर्षांपासून जे काम केले त्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार मला मिळाला. या पुरस्कारामुळे पुढील कामासाठी नक्कीच बळ मिळेल. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी आता एक चळवळ सुरू झाली आहे. तिला ब्लॉकचेनच्या माध्यमातून आणखी मोठी आणि सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे. गौरव सोमवंशी

****

उद्योग क्षेत्रासाठी मला ‘लोकसत्ता’चा तरुण तेजांकित पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे उद्योग वाढविण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे. अहमदनगरसह महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे याला आम्ही प्राधान्य देणार आहोत. पुढील कामासाठी आता मला या पुरस्कारामुळे बळ मिळेल. ओंकार कलवडे

****

मला नवउद्योजक म्हणून आज पुरस्कार मिळाला आहे. मशीन टूल्ससाठी रोबोटिक्स बनविणारी आमची कंपनी आहे. आम्ही जे तंत्रज्ञान यासाठी वापरतो त्यावर आधारित मशीन जपान आणि जर्मनीमधून भारतात आयात केल्या जातात. आम्ही आमच्या एकूण उत्पादनाच्या ६० टक्के मशीन जर्मनी, चीन, जपानसारख्या देशांत निर्यात करतो. या पुरस्कारामुळे आता आमच्या पुढील कामासाठी प्रेरणा मिळेल.     – समीर केळकर

****

लहानपणापासून लोकसत्ता हेच वर्तमानपत्र आमच्या घरी येते आणि आज ‘लोकसत्ता’कडून मला माझ्या कामाची पावती मिळत आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. इतर विजेत्यांचे कार्यही मला प्रेरणादायी वाटले. मी यापुढेही असेच काम करत राहीन. या पुरस्कारासाठी खूप खूप धन्यवाद.                  – चैतन्य ताम्हणे

****

मी गेली अनेक वर्षे बॅडिमटन खेळत आहे. नुकतेच मला या खेळासाठी जागतिक पातळीवर क्रमांक एकचे मानांकन देण्यात आले आहे. पॅराबॅडिमटनमध्ये अपंगत्व असलेली कोणतीही व्यक्ती आपले नशीब अजमावू शकते. जास्तीत जास्त खेळाडूंनी बॅडिमटन या खेळात सहभागी व्हावे आणि यापुढील स्पर्धेत भारताचे नाव मोठे करावे अशी माझी इच्छा आहे. आता पॅरिसमध्ये २०२४ साली होणाऱ्या पॅराऑलिम्पिकमध्ये खेळणे हे माझे ध्येय आहे.

मानसी जोशी

****

मला नुकतेच यूथ वल्र्ड बॉिक्सग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळाले आहे. तसेच मला जगातील सर्वोत्कृष्ट मुष्टीयोद्धाचा सन्मानही मिळाला आहे. मुष्टीयुद्ध क्रीडाप्रकारात अनेक तरुणांनी सहभागी व्हावे आणि आपले भविष्य घडवावे. भविष्यात या खेळातून ऑिलम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची माझी इच्छा आहे.

अल्फिया पठाण

****

मी उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आम्ही एक पिरॅमिड मॉडेल तयार केले आहे, यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नयेत, असा प्रयत्न आहे. शिवाय या हेल्पलाइनवरून शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रश्नांना शाश्वत माहिती देत आहोत. मराठवाडा, विदर्भ आणि भारतातील १४ जिल्ह्यांना एक शाश्वत मॉडेल देण्याचा विचार सुरू आहे.   – विनायक हेगाणा

****

 ‘व्ही स्कूल’ नावाचे एक अ‍ॅप आम्ही तयार केले आहे. ज्याचा ८० टक्के वापर मजूर आणि शेतकरी वर्गातील विद्यार्थी मोफत करत आहेत. महाराष्ट्रातील ११ लाख मुलांना आम्ही मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमाला सात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य केले आहे. एक शिक्षक गावात उत्तमरीत्या शिक्षण देत असतो. त्याचबरोबरीने अन्य एक शिक्षक गावात तेच शिक्षण देण्यासाठी धडपडत असतो. अशाच शिक्षकांना एकत्र आणून त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम आम्हाला करायचे आहे. जेणेकरून चांगल्या पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल.

                              – ऋतुजा जेवे

****

 ‘लोकसत्ता’ने दिलेल्या या पुरस्काराने मला बळ मिळाले आहे आणि आणखी चांगल्या पद्धतीने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. माझी या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल ‘लोकसत्ता’चा मी खूप खूप आभारी आहे.

                              – शिशिर शिंदे

****

या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल ‘लोकसत्ता’ची मी खूप आभारी आहे. टाळेबंदीत निर्माती म्हणून मी खूप काम केले आहे. त्यासाठीच मला या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच वेळी इतर पुरस्कार विजेत्यांबरोबर हा पुरस्कार मिळाल्याचा अभिमान आहे. चांगले काम केल्याची ‘लोकसत्ता’ने मला या पुरस्काराद्वारे पावती दिली आहे.

                              – मनवा नाईक

****

इतर पुरस्कार विजेत्यांचे काम खूपच थोर आहे. देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळालेली आहे. त्यांच्या कामाच्या तुलनेत मी करत असलेले काम फारच छोटे आहे. त्यामुळे अशा व्यक्तींसह हा पुरस्कार मिळाल्याचा मला अभिमान आहे.                               – सारंग साठय़े

****

‘लोकसत्ता तरुण तेजांकित २०२१’ या पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्यांच्यासह ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रियदर्शनी कर्वे, पीडब्ल्यूसी (इंडिया)चे सुभाष पाटील, ‘स्नेहालय’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी यांचा ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी सत्कार केला.